विंग गावचे सुपुत्र श्री संजय भागवत डकरे यांची प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी निवड

विंग गावचे सुपुत्र श्री संजय भागवत डकरे
यांची प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी निवड करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा , आणि राष्ट्रीय महामंत्री भगवान बागुल यांची सही असलेले नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. श्री. स़जय डकरे हे गेल्या चोवीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात सेवेत आहेत. आम्ही लहान वयापासूनच मुलांमध्ये आत्मनिर्भर बनण्यासाठी मार्गदर्शनपर धडे देत असतो.व त्या़च्यावर योग्य संस्कार करत असतो. असं संजय डकरे यांचं मत आहे. याअगोदर पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून दोन वर्षे त्यांनी काम केलेले आहे. त्यावेळी उच्चशिक्षित व काही अधिकारी पदावर काम करणाऱ्या , तसेच राजकीय , सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींची जिल्हा , तालुका पातळीवर त्यांनी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली नियुक्ती केली होती. सर्व प्रकारच्या तळागाळातील नागरीकांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. वरचेवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा जिल्हाध्यक्ष म्हणून ते घेत होते. त्यांची कार्यतत्परता , संघटन कौशल्य बघून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुकेश शर्मा , राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर , राष्ट्रीय महामंत्री भगवानराव बागुल , महाराष्ट्र राज्य महासचिव अनिल भाऊ कचरे या सर्वांनी संगनमताने श्री. संजय डकरे यांना प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड केली.
आज माझी झालेली निवड एक ते फक्त समाजात मिरवण्यासाठी मिळालेले पद नसुन ती एक आव्हानात्मक सामाजिक कार्याची वरीष्ठांनी टाकलेली जबाबदारी आहे. असं मी समजतो असे श्री संजय डकरे म्हणाले.
त्यांच्या निवडीबद्दल संघटनेतील सर्व वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी तसेच त्यांचे मित्र वर्ग , सामाजिक , राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी अभिनंदन केले. व शुभेच्छा दिल्या.