अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात;👉आता मुलाचीही होणार चौकशी!*

*मुंबई :-मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पैसे वसुलीबाबत केलेल्या गंभीर आरोपानंतर यांना मंत्रिपद गमवावं लागलं आणि त्यांची ईडी चौकशीही सुरू झाली. ईडीने अनिल देशमुख यांना आतापर्यंत तीनवेळा चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. मात्र देशमुख यांच्याकडून विविध कारणे पुढे केली जात आहे. अशातच आता अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.*

*👉अनिल देशमुख यांना ५ जुलै रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं असून याच प्रकरणात मुलगा ऋषीकेश यांना ६ जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं सांगण्यात आलं आहे. ईडीकडून याआधीच अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. तसंच त्यांच्या स्वीय सहाय्यकाला आणि खासगी सचिवाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आता देशमुख पिता-पुत्रांचीही चौकशी होणार आहे. आणि देशमुखांचा प्रतिसाद ईडीने अनिल देशमुख यांना २५ तारखेला पहिले समन्स बजावले होते. तर दुसऱ्या समन्सनंतर त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर राहिले होते. दरम्यान अनिल देखमुख हे आता कार्टाच्या पर्यायाची चाचपणी करत आहेत. कोर्टाकडून आपल्याला नक्की दिलासा मिळेल असे त्यांना वाटत आहे. मात्र, देशमुख यांनी दिलेली हजर न होण्याची कारणे ईडीने बाजूला सारत तिसरे समन्स बजावले आहे. आपण सर्वप्रकारच्या चौकशीसाठी तयारच आहोत, परंतु आधी आपल्याला दस्तावेज देण्यात यावेत, अशी मागणी देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून केली होती. देशमुख यांनी ईडीकडे या प्रकरणाच्या ईसीआयआरची प्रत देखील मागितली आहे. १०० कोटींच्या खंडणी वसुलीप्रकरणी नेमकी कशाप्रकारच्या तक्रारीचा अहवाल तयार करण्यात आला याची सविस्तर माहिती या ईसीआयआरमध्ये असते.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!