कर्तृत्वाला लागलेली कीड*
▶️ *_अहंकार_*
🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐

अहंकाराचा जन्म आपल्या
कर्तृत्वातूनच होत असतो.
_जन्माला आल्यानंतर आपले *अस्तित्व, कर्तृत्व आणि अमरत्व* सिद्ध झालेच पाहिजे, हाच *खरा पुरुषार्थ* आहे, परंतु हे सर्व करत असताना, *ते अहंकारविरहीत होणे, हा प र म पु रु षा र्थ* आहे._
💬💬💬
आपली स्वयंम निर्मिती आपले
▶️ *अस्तित्व* सिद्ध करत असते.
आपल्या स्वतःला वजा करून,
जे उरत असते, ते आपले
▶️ *कर्तृत्व* असते आणि
आपल्या कर्तुत्वाचा जो भाग जगाला दिशा देण्यासाठी अनंत काळपर्यंत उपयोगी पडत असतो, ते आपले
▶️ *अमरत्व* असते.
आपल्या आयुष्यामध्ये आपण ✊🏾स्वकर्तुत्वाने जे मिळवत असतो, त्याचा नाश आपल्याच अहंकाराने आपण स्वतः करत असतो.
_जोपर्यंत कर्म फळाची अपेक्षा आहे, तोपर्यंत कर्माचा अहंकार निर्माण होण्याची पार्श्वभूमी आपल्या अंतःकरणात तयार होत असते_. याचा अर्थ
_*अहंकारविरहीत होण्यासाठी*_
जीवनातील पहिल्यांदा
▶️ *आशा आणि अपेक्षा*
संपविल्या पाहिजेत.
या संपल्याशिवाय आपल्या जीवनात कोणतेही
▶️ *वैराग्य* शक्य नाही आणि
वैराग्याशिवाय जीवनात मनापासून
▶️ खरा *त्याग* घडत नाही.
ज्याठिकाणी त्याग आहे, त्या ठिकाणी
▶️ *अहंकाराचा नाश* आहे.
त्यागी वृत्ती अंतःकरणात निर्माण होण्यासाठी
▶️ *सत्याचा परिचय* आपल्याला व्हावा लागतो.
सत्य आणि असत्य यातला भेद
▶️ विवेकाने कळतो आणि
_विवेक/wisdom हा सत्संगतीने, ग्रंथसंगतीने, चिंतनाने आणि साधनेने जीवनात तयार होत असतो_.
ज्या व्यक्तीच्या जीवनात या गोष्टी कधी येतच नाहीत, त्यांना आपण अहंकारी आहोत, हेच समजत नाही आणि जे समजतच नाही ते कधीच मान्य होत नाही. *अशा लोकांचा अहंकार मरेपर्यंत जात नाही.*
🔲🎭🔲
आपल्या जीवनातील
*अहंकारविरहीत अवस्था*
ओळखण्याची एकच निकष आहे
आणि तो म्हणजे *नम्रता*.
🙏🏻जीवनातील अहंकार गेल्याशिवाय आपल्या कोणालाही नम्र होता येत नाही.
🙏🏻नम्रता ही अहंकारापेक्षा अतिशय
बलवान असते. नम्रतेची ताकद
🛕 तुकोबाराय वर्णन करतात,
*नम्र झाला भूता l त्याने कोंडिले अनंता ll*
*हेच शूरत्वाचे अंग l हरि आणिला श्रीरंग ll*
🙏🏻नम्रता आपल्याला
बलवान बनवत असते आणि
अहंकार आपल्याला
मानसिक रोगी बनवत असतो.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
✒️ *डॉ. आसबे ल.म.*✒️
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
📞मो.नं.9822292713.📞

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!