*आई-वडिलांच्या नजरेतील*
*आ प ला मि त्र*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपल्या जीवनात मित्राचे स्थान अनन्यसाधारण आहे, परंतु _जिवाभावाचे मित्र_ संख्येने फार कमी असतात, कदाचित यासाठी भाग्य असावे लागते.
*जीवाभावाचे* या शब्दातच
त्या मित्रांची उंची सामावलेली आहे.
*जिवाचा मित्र* याचा अर्थ
जो जिवाशी जोडलेला आहे, देहासी नाही.
↘️ _जो जिवाचा आहे_, तो आपल्यासाठी स्वतःचा जीवही द्यायला तयार असतो आणि आपणही त्याच्यासाठी आपला जीव द्यायला तयार होतो, हा जीवाचा मित्र आहे.
↘️ *भावाचा* म्हणजे अंतःकरणातील मित्रत्व भावाने जोडलेला दोस्त.
↘️यामध्ये दो म्हणजे दोन शरीरांचा
अस्त होऊन भावनेने एकरूप झालेला,
↘️आपल्याशी अद्वैत साधलेला, जो
आपला असतो, तोच दोस्त असतो, म्हणून
*जीवनामध्ये जिवाभावाचा जो असतो,*
*तोच आपला खरा मित्र असतो.*
बाकीचे सगळे मित्र
गरजेपोटी, स्वार्थापोटी, लाचारीपोटी
आपले मित्र झालेले असतात.
_अशा मैत्रीचे सोंग घेतलेल्या मित्रांमध्ये आणि जीवाभावाचे मित्रांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो._
*हा फरक वेळीच ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांच्या जीवनात _मैत्रीइतका तोटा आणि धोका_ कशातच होत नाही.*
अशा बेसावध व्यक्तींचा गळा
नेहमी मित्राकडूनच कापला जातो,
मग ते क्षेत्र कोणतेही असो.
अशा बेसावध व्यक्तींचा घात
मित्राकडून ठरलेलाच असतो.
⛳विश्व माऊली ज्ञानदेव म्हणतात,
*जववरी रे तववरी मैत्रत्व संवाद l*
*जव अर्थेसी संबंध घडला नाही बाप ll*
🦩
अशा घातकी मित्रांचा डाव नेहमी आपल्या आईवडिलांच्या लक्षात येत असतो, परंतु 😓मुले आपल्या मित्रांविषयी आई-वडिलांकडून एकही अपशब्द ऐकायच्या मानसिकतेत नसतात.
आपल्या जीवनाचे हीत प्रामाणिकपणाने पाहणारे फक्त आई-वडील असतात.
*शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाला धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न फक्त आई-वडील करत असतात,* परंतु दुर्दैवाने मित्राच्या बाबतीत अशा बेसावध मुलांना ते कधीच खरे वाटत नाही.
🛕🛕🛕
*लेकुराचे हीत वाहे माऊलीचे चित्त ।*
*ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती ।।*
👤मित्रापासून असलेला धोका,👤
आई-वडिलांच्या लक्षात आला, तर
आई-वडील पदोपदी आपल्या मुलांना त्यापासून सावध करत असतात, धोक्याची जाणीव करून देत असतात, परंतु
मित्रप्रेमाने आंधळी झालेली मुले, “आई-वडिलांना माझा मित्र समजलाच नाही किंवा त्यांना ते समजतच नाही,” असा गैरसमज करून घेतात आणि सावध करणाऱ्या आई-वडिलांना हळूहळू अशी मुले आपल्या मित्रांच्या संबंधीची कोणतीही गोष्ट सांगायचेच टाळू लातात.
हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा मुर्खपणा असतो, कारण _आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेत आपले सुख शोधणारे फक्त आई-वडील असतात._
त्यामुळे मुलांनी निःसंकोचपणे
आपल्या आई-वडिलांशी
प्रत्येक विषयाची चर्चा करायला हवी.
⚔️शिवरायांच्या जीवनात माँसाहेब जिजाऊंशी चर्चा केल्याशिवाय त्यांचे एक पाऊलही पुढे पडत नव्हते.
⚔️शिवरायांचे युगपुरुष होण्याच्या मागे मातृभक्त हा गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पाया आहे.
*_आई-वडिलांनी सावध केलेल्या आणि सल्ला दिलेल्या कोणत्याच गोष्टी दुर्लक्षित करण्यासारख्या नसतात_, हे मुलांनी आयुष्यभर लक्षात ठेवावे.*
🙏🏻ज्या दिवशी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष होईल, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने आपल्या भोवती असलेले _सुरक्षा कवच_ फेकून दिलेले असते आणि तेथून पुढचा काळ आपण सर्वात जास्त असुरक्षित झालेलो असतो.
जगाचा इतिहास पहा, तुम्हाला हेच चित्र दिसेल की _जगातील अनेक शूरांचे वीरांचे घात त्यांच्या जवळच्या गद्दार आणि ढोंगी मित्रांनीच केलेले आहेत किंवा अशा मित्रांमुळेच शत्रूला ते करता आलेले आहेत_.
ज्यांना आपण शत्रू समजतो अशा
शत्रूपासून आपण नेहमी सावध असतो,
परंतु ढोंगी मित्रांपासून आपण
नेहमी बेसावध असतो.
🦩
*शत्रु समोरुन वार करतो, परंतु घातकी मित्र पाठीमागून वार करतो आणि तो आपल्यासाठी निर्णायक असतो.*
आपण त्यातून कधीच स्वतःला सावरू शकत नाही आणि त्यातून पुन्हा उभारी घेऊ शकत नाही.
_ज्याला जिवाभावाचा मित्र आणि ढोंगी मित्र, यातला फरक समजत नाही, त्याने फक्त *आई-वडिलांचा सल्ला मनापासून स्वीकारावा आणि कृतीत आणावा*, जीवनात कधीही धोका होणार नाही._
जिवाभावाचा मित्र आणि ढोंगी मित्र,
यातला फरक आपल्यापेक्षा आपल्या
आई-वडिलांना अनुभवाने जास्त कळत असतो.
*जगातील कोणतेही आई-वडील आपल्या पासून आपल्या जिवाभावाच्या मित्राला कधीच तोडत नाहीत, _त्यांना तोडायचे असते, ते फक्त ढोंगी आणि घातकी मित्रांनाच_.* म्हणूनच
उपनिषदे या दोघांना नमस्कार करतात.
*मा तृ दे वो भ व ।*
*पि तृ दे वो भ व ।*
🎓🎓🎓🎓🎓🎓
*डॉ. आ स बे ल. म.*
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार._
🎓🎓🎓🎓🎓🎓
📞मो.नं.9822292713.📞

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!