*भेद*
अंतःकरणात भेद आहे, तोपर्यंत
↘️तुलना, भीती आणि लाज निर्माण होते.
जेथे तुलना आहे, तेथे
↘️मत्सर आहे, स्पर्धा आहे, दंभ
आणि अहंकार आहे.
*आपण कोणापेक्षा तरी*
*कमी असतो किंवा जास्त असतो*,
_कमी असलो तर *मत्सर* निर्माण होतो_ आणि
_जास्त असलो तर *दंभ व अहंकार* निर्माण होतो._

_आपल्या सुखाचा, शांतीचा आणि समाधानाचा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल⁉️ तर ते *भय/Fear* आहे._
अंतःकरणात भय असेल, तर आपण प्राप्त असलेल्या कोणत्याही गोष्टीतला आनंद मनापासून आणि संपूर्णपणे घेऊ शकत नाही, मग देवाने आपल्याला आनंद देऊन सुद्धा तो आपल्यासाठी निरुपयोगी ठरतो.
◼️ *अं तः क र णा ती ल भय*
*अज्ञानामुळे निर्माण होत असते*, त्याचबरोबर
*स्वतःचे स्वरूप न कळल्यामुळे होत असते.*
◼️लाज निर्माण होण्यासाठी
भेदच कारणीभूत असतो.
⛓️स्त्री-पुरुष भेद, ⛓️उंच-नीच भेद,
⛓️गरीब-श्रीमंत भेद, ⛓️सौंदर्य-कुरूप भेद,
⛓️ज्ञानी आणि अज्ञानी यातील भेद,
या सर्व भेदाच्या ठिकाणी
आपली न्यूनता असेल, तर लाज निर्माण होते.
◼️लाजणारा माणूस, आपल्या जवळ सर्व प्रकारची क्षमता असूनही, स्वतःला कमजोर समजतो आणि त्याच्या जीवनातील शौर्याला प्रगट होण्यापासून परावृत्त होतो.
_तुलना, भय आणि लाज या तिन्ही गोष्टी आपल्या प्रगतीला आणि समृद्धतेला हानिकारक आहेत._
भौतिक, संसारिक आणि व्यवहारिक पातळीवरून यांना आपण कधीच संपवू शकत नाही.
जोपर्यंत आपण यांना संपवत नाहीत, तोपर्यंत _विकाररहित_ होऊ शकत नाही आणि
जोपर्यंत विकार आहेत तोपर्यंत
आपण _समतेत_ येऊ शकत नाही.
_जेथे समता नाही, तेथे भेद आहे. यामुळे कितीही मोठा संसार आणि प्रपंच केला तरी माणूस सुखी होऊ शकत नाही._
🛕🛕🛕
*संसाराचे अंगी अवघीच व्यसने l*
*आम्ही या कीर्तने शुद्ध झालो ll*
*आता हे सोहळे झाले त्रिभुवन l*
*विषम धोवोनि सांडियेले ll*
विषमता म्हणजेच भेद गेल्याशिवाय आपल्याला शुद्ध आणि पवित्र होता येत नाही. याचा अर्थ
*भेद म्हणजे विषमता,*
*हा जीवनातील खरा विटाळ आहे* आणि
*समता हेच जीवनातील खरे सोवळे आहे*
अंतःकरणातून भेद म्हणजेच
वि|ष|म|ता,
ही फक्त परमार्थिक उपायाने,
सा|ध|ने|ने संपविता येते.
समतेत येण्यासाठी
आ|त्मि|क पातळीवर यावे लागते
आणि आत्मिक पातळी
अ|ध्या|त्मा|शिवाय शक्य नाही, म्हणूनच
_परमार्थात सुख आहे आणि आत्मिक पातळीवर सर्व सुख आहे, असे म्हटले जाते._
🛕🛕🛕
*ऐसा ज्याचा अनुभव l विश्वदेव सत्यत्वे ll*
*देव तया जवळी असे l पाप नासे दर्शने ll*
*कामाक्रोधा नाही चाली l भूती झाली समता ll*
*तुका म्हणे भेदाभेद l गेला वाद खंडोनि ll*

🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ _*डॉ. आसबे ल.म.*_✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार_.
📞 मो.नं.9822292713.📞

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!