*वि श्व गु रू :- डॉ. ल.म.आसबे (कामधेनु परीवार)

💎💎💎💎💎💎
🎓 *वि श्व गु रू* 🎓
💎💎💎💎💎💎
राजकारणात संधीचा फायदा उठवणारी
माणसे मोठी होत असतात.
राजकारणात संधी शोधायची नसते,
तर ती तयार करायची असते.
*घडलेली प्रत्येक घटना चांगली असो वा वाईट, _त्या घटनेकडे संधी म्हणूनच खरे राजकारणी पहात असतात_.*
या लोकांना सुखद, दुःखद कसल्याही घटना
राजकारणासाठी उपयोगी पडत असतात.
*संपूर्ण समाज शांत, सुखी आणि समाधानी असला, तर राजकारण करता येत नाही.*
याच्या उलट परिस्थिती निर्माण केल्याशिवाय
अशा लोकांचे अस्तित्व
समाजाला जाणवत नाही.
🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️🏛️
समाजाला अति त्रास देणाऱ्या माणसाला किंवा
समाजासाठी प्रामाणिकपणाने स्वतःला अतिशय त्रास करून घेणाऱ्या माणसालाच
समाज लक्षात ठेवतो,
मधल्या माणसाची दखलही समाजाने
कधी घेतली नाही, घेतही नाही
आणि पुढेही घेणार नाही.
_अन्यायाशिवाय बंड होत नाही_,
_बंडाशिवाय बदल होत नाही_ आणि
_बदलाशिवाय राजकारण करता येत नाही._
👁️‍🗨️अन्याय झालेला, समाजाला समजत असतो,
परंतु अन्यायग्रस्त समाज संघटित नसतो.
👁️‍🗨️समान दुःख, समान अडचणी यातून
संघटन तयार होते.
👁️‍🗨️त्याचे नेतृत्व करणारा नेता होतो, _
🤦🏽‍♂️दुर्दैवाने असा नेता लोकशाहीत लोकनेता न राहता भविष्यात पुढे स्वार्थी पक्का राजकारणी बनतो,_
ही प्रक्रिया आहे आणि अनादिकालापासून ती चालत आलेली आहे यात बदल होणार नाही.
नेतृत्व निःस्वार्थी राहणे
आजच्या काळात सर्व समाजाला अपेक्षित आहे,
परंतु व्यवहारीकदृष्ट्या हे अतिशय कठीण आहे.
दगडापेक्षा वीट बरी
अशी समाजाची काहीशी अवस्था आहे.
⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️
*शि व रा यां चा आ द र्श,*
राजकारणासाठी प्रत्येक नेत्याच्या समोर असावा.
हा राजा अन्यायाच्या विरोधात बंड करून उभा राहीला, _लोकनेता_ झाला.
आपल्या आयुष्यातील एकही क्षण स्वार्थी वागला नाही, त्यामुळे तो _युगपुरुष_ ठरला.
त्यांच्या मृत्यूनंतरही हजारो पिढ्यांसाठी आदर्श म्हणूनच _गुरु_ ठरला.
🤦🏽‍♂️ *दुर्दैवाने आज छत्रपती शिवाजीराजांसारख्या विश्वगुरूला _आदर्श समजण्याऐवजी, सर्व पक्षाचे राजकारणी राजकारणातील एक प्रभावी हत्यार म्हणूनच वापरतात_.*
_ज्या दिवशी या विश्वगुरूला_,
_लोकनेते गुरु म्हणून स्वीकारतील_
_त्या दिवशी खऱ्या अर्थाने_
*भारत विश्वगुरू होईल.*
या दिवसाची वाट भारतातील प्रत्येक
सुजाण नागरिक उत्कंठेने पहात आहे.

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
✒️ *डॉ.आसबे ल.म.*✒️
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
_अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार_.
📞मो.नं.9822292713.📞