सोलापुरात भाजप च्या खासदार,आमदारावर गुन्हे दाखल

सोलापूर जिल्ह्यावर रेमडेसिविर व लसीच्या वितरणामध्ये होत असलेल्या अन्याया विरुद्ध व ते पुरेशा प्रमाणात मिळण्याकरिता आंदोलन केले प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार व आठ आमदारांसह इतर कार्यकर्त्यावर सोलापूर शहरातील सदर बाझार पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या मध्ये सोलापूरचे खासदार डॉ जयसिधेश्र्वर महस्वमी, माढा लोकसभा खासदार रणजित निंबाळकर नाईक,बार्शी चे आमदार राजेंद्र राऊत,सोलापूर चे आमदार सुभाष देशमुख, विजयसिंह देशमुख,विधान परिषद चे आमदार प्रशांत परिचारक, रणितसिंह मोहिते पाटील, अक्कलकोट चे आमदार सचिन कलशेट्टी, माळशिरस चे आमदार राम सातपुते,पंढरपूर मंगळवेढा चे आमदार समाधान अवताडे या लोकप्रतिनधीं चा समवेश आहे.

यांच्या विरुध्द भादवि कलम 143,188,269,366 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(बी)आणि भारतीय साथ रोग अधिनियम 1897चेकलम3सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135प्रमाणे या लोकप्रिनिधींनीवर गुन्हे दाखल केले आहेत.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!