नमोन्यूजनेशन :-

रायगड सर करणारी आता पर्यंतची सर्वात लहान हिरकणी शिवाज्ञा पूजा/अंबरिष मारुती श्रीखंडे

मु पो बावी ता बार्शी जिल्हा सोलापूर ही दीड वर्षाची चिमुकली तिने धडकी भरणारा बाल वयात पराक्रम करून दाखवला, रायगड सारखा बलाढ्य किल्ला पाई सर केला, जिथं आम्हांला भीती वाटतं होती तिथं ही तुरुतुरु पळत होती, महाराजांच्या पदस्पर्शाला आसुसल्याने चढताना भान हरपून गेली होती, तिच्या चालन्याला लोकांचा आदर भेटत होता, तिच कौतुक केलं जात होत, आणि या गोष्टी आमचा उत्साह वाढवत होत्या, मग आम्ही सुद्धा तिला तिच्या एवढंच लहान होऊन चालन्यास मदत केली, कधी मागून धक्का देयचा तर कधी तोंडातून गाडीचा आवाज काढायचा कारण उंच चढ आला की तिचे तोल जायचे मग तिला मागून धक्का द्यावा लागायचा कधी मोठ्या पायऱ्या येयच्या त्यावेळी पण तिला थोडी मदत करावी लागायची पण ती सहसा हात लावू देयची नाही, लोक ती जवळ आली की तिला रस्ता करून देयचे पुढून येणारे सुद्धा थांबून पहायचे फोटो काढायचे याकडे तीच लक्ष नसायचं तीच आपलं गुणगुणत चालन चालूच असायचं, जवळपास कूट छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की ही जय म्हणायला विसरायची नाही, मुलगी प्रत्येक घरात हवी पण मुलीला परक्याच धन म्हणुन हिनवल जात, उमलायच्या अगोदर कळ्या तोडल्या जातात,मुलीला भार समजलं जातं,त्याच जनमानसात माझ्या चिमुकलीन बापाची आवड आनंद शोधला आणि त्यात आजून भर टाकली पप्पा मला रायगडला येयचय इथं पर्यंत ठीक आहे पण पप्पा मी तुमच्यावर भार नाही होणार मी लहान असले म्हनून काय झालं मी तुमच्या बरोबरीन रायगड चढणार आसा आंतरिक आवाज मी समजू शकलो, रायगडच्या पायथ्याला पोहचताच मला चालू द्या म्हणुन रडणाऱ्या माझ्या चिमुकलीत जणू मला माँ साहेब जिजाऊच दिसल्या, म्हणून माझं प्रामाणिक मत आहे त्यांना संधी द्या, कारण घरात अगोदर जिजाऊ घडण गरजेचं आहे मग शिवाजी महाराज नक्की घडतील, त्या तुमच्यावर भार कधीच होणार नाहीत तर तुमची स्वप्न तुमच्या कार्यात सर्वात पुढं हिरीरीन झोकून देणाऱ्या बापाच्या लाडक्या मुली असतात. हे माझ्या चिमुकलीन रायगड सर करून दाखवून दिलं आहे. पडत सावरत तीन रायगड सर केला अत्ता पर्यंत एवढ्या लहान वयात रायगड सर करणारी कदाचित ही पहिलीच आसेल,
खरंच रायगड आणि रायगडचा राणा हे प्रचंड मोठे ऊर्जास्रोत आहेत, हेच या चिमुकलीन दाखवून दिलं आहे.
तिच्या या व्हिडीओमुळे यापुढे देशातीलच नव्हे तर जगभरातील अनेक पर्यटक सहकुटूंब कधीही निःसंकोचपणे रायगड पाई चढतील आणि तेंव्हाच त्यांना रायगडची भव्यता दिव्यता आणि महाराजांच्या दूरदृष्टीची अनुभुती येईल, महाराजांनी रायगडच का निवडला आसेल राजधानीसाठी याचा जवळून अनुभव घेता येईल, करण रायगड स्वामिनिष्ठेच, धगधगत्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देणार जगभरात नावलौकिक असणारं एकमेव शिल्प आहे अशा अनेक कलागुंनसम्पन्नतेचा समुच्चय आसलेला रायगड एका चिमुकलीन सर करावा यापेक्षा मोठा आनंद अजून काय असावा.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!