नमोन्यूजनेशन
(दिनांक.2/5/2021)
पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान अवताडे आले निवडून
भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव करत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. गेली अकरा वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराकरीता माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुभाष देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आदी नेत्यांनी महा विकास आघाडीच्या कारभारावर तोफा टाकत प्रचाराचे रान उठवले होते आजच्या निकालावरून त्यांना यश येताना दिसून आले.
पंढरपूर चा निकाल हा राज्य सरकारच्या विरोधात चा कौल..
आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच’ असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रीया दिली आहे.
आ गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ असा सवाल त्यांनी विचारला आहे..
मोहिते-पाटील यांनी मागील पराभवाचा वचपा काढला..
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2009 साली पंढरपूर मधून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी पराभव केला होता. या पराभवाचा वचपा आज भगीरथ भालके यांचा पराभव करत मोहिते-पाटील यांनी काढला आहे. जिल्ह्यात मोहिते-पाटील गटाची ताकद असल्याचे त्यांनी दाखवून दिली आहे.
निवडणुकीनंतर पुण्याच्या द स्ट्रेलेमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. तो तंतोतंत खरा ठरताना दिसून येत आहे त्यामध्ये नोंदवलेले निष्कर्ष तंतोतंत खरे ठरले आहेत. त्यानुसार समाधान आवताडे यांचा 3810 मताने विजय होईल असे संस्थेच्या सर्वेनुसार सांगितले होते ते खरे ठरताना दिसून आल
