लोककलावंतांच्या मागण्या शासनदरबारी मांडून त्या सोडवण्यास प्रयत्न करणार : मा.श्री.महादेव मिसाळ.

लोककलावंतांच्या मागण्या शासनदरबारी मांडून त्या सोडवण्यास प्रयत्न करणार : महादेव मिसाळ.

कोविड १९ च्या महामारीमध्ये महाराष्ट्रातील लोककलावंत तसेच इतर कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकरीता भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लोककलावंतांचा सर्वे करुन त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडून कलावंतांना न्याय देणार असल्याची माहिती भारतीय दलित संसदचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महादेव मिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील लोककला जिवंत ठेवण्यासाठी कलावंतांनी आपल्या महाराष्ट्राच्या मातीशी कलेची पिढ्यांनपिढ्यांची नाळ जोडून त्या लोककलेचे जतन आणि ‌संवर्धन करुन प्रसंगी उपासपोटी राहून आपली कला जोपासली आहे.

हे लोककलावंत तसेच इतर कलाकार हे गेली दोन वर्षे झाले हालाकीचे जीवन जगत आहेत याचे भान ठेवून भारतीय दलीत संसद या महाराष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने या कलाकारांचे दैनंदिन जीवन जगणे सुसह्य व्हावे. यासाठी न्यायमार्गाने कलाकारांच्या मागण्या शासनदरबारी मांडून त्या मागण्या मंजूर करुन कलाकारांना एक शाश्वत हमी देण्यासाठी संघटनेच्या वतीने एक निर्धार पाऊल उचलले असून कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी इंदापूर तालुक्याबरोबरच, पुणे जिल्ह्यांसह, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा, विदर्भ अशा अखंड महाराष्ट्रातून कलाकारांचा सर्वे करणार असल्याचे मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

या सर्वे करीता कलाकारांनी आपले नाव, गाव, कलेचा प्रकार, कायमचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक यांची संपूर्ण माहिती तमाशाकलावंत कुमार साठे मो.नं.7798233278, सदाशिव मोरे मो.नं. 9763874040, संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय गायकवाड.मो.नं. 9130929229 यांच्याकडे द्यावीत असे मिसाळ यांनी म्हटले आहे.

====================================