अभाविप इंदापूर च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

अभाविप इंदापूर च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इंदापूर यांच्या वतीने इंदापूर येथील मुक्ताई ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा.श्री.प्रशांत बंगाळे व भाजयुमो कार्यकर्ते प्रेमकुमार जगताप यांच्या उपस्थिती मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
यावेळी अभाविप इंदापूर शहरमंत्री अजय चव्हाण म्हणाले की एक मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींना covid-19 लस उपलब्ध होणार आहे. लस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही. यामुळें रक्त पुरवठ्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तरी सर्व युवकांनी कोरोना रुपी राक्षसाला संपविण्यासाठी अवश्य रक्तदान करावे.यावेळी अभाविप बारामती जिल्हा संयोजक समीर मारकड उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अभाविप इंदापूर सहशहर मंत्री अवधूत बाचल, चैतन्य माळशिकारे, अथर्व कांबळे, प्रथमेश पिसे, दीपक जमदाडे व स्वप्नील भंडलकर आदींनी मोलाचे परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मुक्ताई ब्लड बँक इंदापूरचे श्री.अविनाश ननवरे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.