संकटात आम्ही राजकारण नाहीतर कृती करतो..

*संकटात आम्ही राजकारण नाहीतर कृती करतो..
सत्तेवर असतानाही एका राज्यमंत्राच्या मुलाला जे जमलं नाही, ते राजवर्धन दादांनी करून दाखवलं. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांचे जवळचे नातेवाईक इंदापूर येथील एका रुग्णालय येथे कोविड रुग्ण म्हणून ॲडमिट आहेत. त्यांना रेमीडीसीवीर इंजेक्शनची गरज लागल्याने जिल्हाध्यक्ष यांचे नातू यांनी बुधवारी राज्यमंत्र्यांकडून रेमीडीसीवीर औषध उपलब्ध होईल म्हणून त्यांच्या मुलांशी संपर्क केला असता, त्यांनी इंजेक्शन मिळू शकत नाही असे उत्तर दिले … मग पेशंट ची बिकट अवस्था पाहून जयदीप यांनी राजवर्धन दादा यांना संपर्क केला व दादांना पेशंटची सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनतर दादांनी एका क्षणांचाही विलंब न लावता स्वतःची यंत्रणा कामाला लावून रेमीडीसीवीर इंजेक्शन मिळवून दिले. राजवर्धन दादांनी.. ना पक्ष पहिला ना जातधर्म पाहिला… या खऱ्या खुऱ्या नि:स्वार्थी समाजसेवेस सलाम !