कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री भाग २ *योग,प्राणायाम आणि ध्यान (मेडीटेशन)*
🚩🧘‍♀🚩🧘‍♂🚩🧘‍♀🚩

🕉 *ओम धन्वंतरैय् नम:*🕉.
*व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र*
मार्गदर्शक *ह.भ.प.बंडातात्या कराडकर*
प्रेरणा
*राष्ट्रबंधू शहीद राजीव दिक्षित*
🤸🏻‍♂ 🧘‍♀ 🧘‍♂ 🤸🏻‍♂
*चळवळ आरोग्याची*

कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री भाग २ *योग,प्राणायाम आणि ध्यान (मेडीटेशन)*

🤸🏻‍♂🧘‍♂🧘‍♀🤸🏻‍♂
जागतिक आरोग्य संघटना आणि हार्डवर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार ज्यांची शारीरिक रोगप्रतिकारशक्ती चांगली अशा लोकांना या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही. कोरोना विषाणूच्या
या सद्यस्थितीमध्ये आपण स्थिर आणि शांत रहाणे गरजेचे आहे.या भयानक स्थितीचा मनाच्या स्थितीवर परिणाम होऊन आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होतो आपली शारीरिक आणि मानसिक रोगप्रतिकारशक्ती वाढवून दैनंदिन जीवनात आनंदी,उत्साही राहण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे *सद्गुरू श्री श्री रविशंकर गुरुजी* तसेच पतंजली योग समितीचे *परपूज्य स्वामी रामदेव बाबा* यांनी सांगितलेले खालील योग प्राणायाम शास्त्रोक्त पध्दतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कि ज्यामुळे आपला या आजारापासून नक्कीच बचाव होईल.
😡✔ *फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणे*
आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता जाणून घेण्यासाठीे डॉक्टर सांगतात की,जो व्यक्ती दीर्घ श्वास घेऊन फुफ्फुसात ३० सेकंद ते १ मिनिट रोखून धरतात ते कोरोनाग्रस्त नाहीत किंबहुना त्यांचे शरीर कोरोनाला प्रतिकार करू शकते.
कोरोनाग्रस्त असेल तो ५-१० सेकंदही श्वास रोखू शकणार नाहीत.
आपल्या फुफ्फुसाची श्वास रोखून धरण्याची क्षमता वाढवून कोरोना सारख्या आजारापासून वाचण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे योग प्राणायाम.
*योगिक जॉगिंग*(सुक्ष्म व्यायाम/शारीरिक हालचाली)
*सुर्यनमस्कार*
हा सर्वांग व्यायामाचा प्रकार आहे.सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.पचनक्रिया सुधारते.मनाची एकाग्रता वाढते दररोज ६ किंवा १२ सुर्यनमस्कार नित्यनेमाने करावेत.
*मुद्रा प्राणायाम*- यामध्ये तर्जनीचे टोक अंगठ्याच्या तळाशी हळूवार दाब देऊन ठेवावे राहिलेली सर्व बोटे सरळ ठेवावीत. दिर्घ आणि खोल श्वास घ्यावा काही काळ रोखून अत्यंत सावकाश सोडावा.ही क्रिया ५मिनिटे करावी यामुळे फुफ्फुसाची श्वास रोखून धरण्याची क्षमता वाढते. श्वसनासंबंधीचे सर्व आजार बरे होतात.
*कपालभाती*
खरे तर हा प्राणायाम नव्हे शरीरशुध्दीकरण क्रिया आहे
यामध्ये मध्यमशक्तीपूर्वक पोटाला आतल्या बाजूला धक्का देवून श्वास बाहेर सोडावा .पोट परत पूर्वस्थितीमध्ये येऊ द्यावे म्हणजेच जाणीवपूर्वक श्वास न घेता आपोआप श्वास घेतला जातो
या प्राणायाममुळे शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड वायू बाहेर पडतो त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा होऊन फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
*भस्रिका प्राणायाम*
वज्रासनामध्ये किंवा सुखासनामध्ये आपल्या सोईनुसार बसून दोन्ही हातांच्या हलक्या मुठी बंद करून त्या खांद्याच्यासमोर धराव्यात. छातीमध्ये श्वास घेत हात वर उचलावेत त्याच वेळी मुठी खोलाव्यात. श्वास सोडताना हात खाली आणत पुन्हा मुठी बंद करत खांद्यासमोर पूर्व स्थितीत आणाव्यात. अशाप्रकारे २०-२०-२०
श्वासाचे ३ राऊंड करावेत. प्रत्येक राऊंड नंतर अर्धा मिनिटे हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने उघडलेले मांडीवर ठेवून विश्रांती घ्यावी.
शरीरातील अशुद्ध घटक व कार्बनडायऑक्साईड बाहेर टाकण्यास मदत होते. फुफ्फुसे अत्यंत बलवान करुन सर्दी, खोकला, दमा, श्वासासह संपूर्ण छातीच्या आजारावर भस्त्रिका ही अत्यंत उपयुक्त आहे.
*नाडीशोधन प्राणायाम*
यामध्ये डाव्या हाताची चिनमुद्रा/ज्ञानमुद्रा(अंगठा आणि तर्जनी यांची टोके जोडून गोल करणे आणि राहिलेली तीन बोटे सरळ) करून उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन ती बंद करून पुन्हा उजव्या नाकपुडीने सोडावा.पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने सोडावा. हा प्राणायाम करताना श्वास घेऊन सोडताना काही काळ श्वास रोखून धरला(कुंभक)तर फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढण्यासाठी फायदा होतो.
या प्राणायाममुळे शरीरातील सर्व नाड्यांचे शुध्दीकरण होऊन प्राणशक्ती शरीरातील प्रत्येक घटकांना पोहचवली जाते. श्वसनासंबंधीचे सर्व आजार बरे होतात. मानसिक संतुलन सुधारते.
*भ्रमरी प्राणायाम*
दोन्ही हाताच्या अंगठ्याने कानाचा तोंडावळा (त्रिकोणी भाग)बंद करून तर्जनी कपाळावर त्याचवेळी मध्यमा,अनामिक आणि करंगळी नासिकेच्या जवळ डोळ्याच्या खोबनीत हलकेसे ठेवावीत.ओठ बंद करून नाकाने दीर्घ श्वास घ्यावा आणि नाकानेच सावकाश श्वास सोडत नाद स्वरूपात भुंग्याप्रमाणे(भ्रमर) गुंजन करावे पुन्हा याचप्रमाणे ही क्रिया ५वेळा करावी.
या प्राणायाम मुळे मानसिक ताणतणाव, चंचलता दूर होऊन मनाची एकाग्रता वाढते. ह्रदयरोग आणि उच्चरक्तदाबा करीता अत्यंत उपयुक्त आहे.
*ओमकार*
श्वासावर लक्ष केंद्रित करून मन स्थिर ठेवून नाकाने दिर्घ श्वास घ्यावा आणि श्वास सोडत अ….ऊ….आणि म….काराचा उच्चार करावा ही क्रिया ५ वेळा करावी.
या प्राणायामुळे मनशांत आणि स्थिर होते.
*ध्यान(मेडीटेशन)*
दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करून वातावराणामध्ये निर्माण झालेल्या आनंदी लहरींची अनुभूती घेत काहीही न करता मंद श्वास आणि प्रश्वास यासोबत विनाप्रयास मनाची विश्रांती म्हणजेच ध्यान
नियमित सरावाने याचा कालावधी १०मिनिटापासून २०मिनिटापर्यंत करावा.
*अँक्युप्रेशर पॉईंट*
👉ब्लड सर्क्युलेशन साठी क्लॉपिंग थेरपी (२००टाळ्या वाजविणे )
👉फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नं३० (अनामिका आणि मध्यमाच्या मध्ये आडव्या रेषेच्या वरती)
👉 लसीकाग्रंथी साठी नं १६ (तळहातापासून चार बोटे खाली मनगटावर)
👉ह्रदयाची बळकटी साठी नं ३६(करंगळी आणि अनामिकेच्या मध्ये आडव्या रेषेच्या खाली)
👉सर्दी साठी नं३४(तर्जनी आणि मध्यमा ची मधील भाग/पेरा)
👉मुत्राशय नं १८(अंगठा आणि तर्जनी यामधून वरून खाली येणारी वक्राकार रेषा याचा शेवटचा भाग)
👉अंगठ्यापासून बाहेरील बाजूने मनगटापर्यंत येणारे पॉईंट नं १ते ७

पुढील भागात

*कोरोना प्रतिबंध त्रिसूत्री*- षट्कर्म(शुध्दीकरण क्रिया)

*जय गुरुदेव*
🤸🏻‍♂ 🧘‍♀ 🧘‍♂ 🤸🏻‍♂

*प्रा धनंजय शामराव देशमुख*
अकलूज(वडापुरी ता.इंदापूर)
📞९२६०७१०७१०
deshmukhvyasanmukti@gmail.com
🙏☝🌹🙏☝🌹🙏

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!