नमोन्यूजनेशन

संकल्पना :- नागनाथ गुरगुडे (उपसरपंच )

आज बाभूळगाव  लसीकरण कसे वाढवता येईल ग्रामपंचायत प्रशासन यासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा झाली आम्ही सर्व सदस्य व ग्रामपंचायत प्रशासन

बाभूळगावकरांना आवाहन करतो कि जे जेष्ठ नागरिक लसीकरण केंद्रावर जाण्यास असमर्थ असतील त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था ग्रामपंचायत करेल त्यासाठी तुम्ही आम्हाला एक फोन करा दुसरे महत्वाचे म्हणजे प्रत्येक घरातील तरुणांनी यासाठी पुढाकार घ्यावा सर्व तरुणांनी आपल्या घरातील जेष्ठ सदस्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगावे गावातील ज्या जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांचे अनुभव त्यांना सांगा त्यांच्याशी फोनवर बोलून काही त्रास होतो का ते विचारा अजून काय करता येईल याबद्दल आपल्या सूचना व मार्गदर्शन अपेक्षित आहे त्याचे आम्ही स्वागतच करू पुन्हा एकदा सर्व तरुण बांधवाना नम्र विनंती कोरोना च्या लढ्यात आपला सहभाग नोंदवा काही अडचण आली तर ग्रामपंचायत शी संपर्क साधा. आपण कोरोनाला हरवणार* …… *बाभूळगाव जिंकणार* !

*आपले नम्र*.
*ग्रामसेवक ,सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य*
*बाभूळगाव ग्रामपंचायत*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!