गावोगावी वृक्ष लागवड ही काळाची गरज किरण गोफणे

गावोगावी वृक्ष लागवड ही काळाची गरज किरण गोफणे,

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व स्वर्गीय गुनाई जगन्नाथ जानकर यांच्या स्मरणार्थ आज दिनांक 14 एप्रिल रोजी वृक्षारोपण कार्यक्रम साजरा झाला,
यावेळी पुणे जिल्हा प्रभारी श्री किरण गोफणे म्हणाले की लाखो वर्षाची वसुंधरा मानवाच्या हव्यासापोटी रास होत चाललेली आहे त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज झालेली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून चालू वर्षी इंदापूर तालुक्यात नऊ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून हि वृक्ष लागवड करून आदरणीय राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेवजी जानकर साहेबांच्या मातोश्री गुनाई जगन्नाथ जानकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे त्याचाच एक भाग म्हणून रासप शाखा चाकाटी च्या वतीने चाकाटी या गावात नऊशे वृक्षलागवड करण्यात येणार आहे. यावेळी चाकाटी गावचे ग्रामसेवक स्वप्नील जी गायकवाड. रा स प तालुकाध्यक्ष सतीश तरंगे. तालुका सरचिटणीस गणेश हेगडकर. इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अभिजीत भाळे. इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते. तात्याराम मारकड. कुलदीप वाघमोडे. माजी सरपंच महेंद्र कांबळे. राजेंद्र मारकड. मोहन मारकड. विक्रमसिंह मारकड कैलास मारकड. विनोद घोडके. रामदास मारकड. भारत सावंत. विठ्ठल रुपनवर. प्रशांत पाटील. प्रणव वाघमोडे. भोलेनाथ घोडके. मच्छिंद्र घोडके आदी ग्रामस्थ उपस्थित होते