🚩🙏अंत एका पर्वाचा तळपत्या सुर्याचा 🙏🚩
माझे आजोबा आणि आपले तालुका संघचालक…….!
कै. आदरणीय. श्रीनिवास हणमंत देशपांडे ऊर्फ दादासाहेब देशपांडे, तर त्यांच्या मित्रपरिवारसाठी आणि बहिणींचा लाडका ” मोरेश्वर ”
बालपणापासूनच हुशार, अभ्यासू विद्यार्थी तर १९५० च्या दशकातील इंदापूर तालुक्यातील संघाचे पहिले बाल-तरूण स्वयंसेवक…..!
१९६० च्या उत्तरार्धात बारामती कोर्टातून वकीलीला सुरूवात करत अनेकानेक गोरगरीबांना आणि इंदापूरकर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटणारा तरूण, ” दादासाहेब ” म्हणून नावारूपाला आले.
पुढे इंदापूर कोर्टाच्या पायाभरणी ते आजच्या नव्या वास्तुचे साक्षीदार असा दैदिप्यमान प्रवास दादांनी केला. इंदापूर बारामती-पुणे कोर्टात ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले वकील म्हणजे #दादासाहेब_देशपांडे अशी ख्याती पंचक्रोशीत आहे.
त्याचबरोबरीने धर्मकार्यात अग्रणी असणारे #दादासाहेब श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानची सेवा करण्याची संधी भगवंतांनी विश्वस्त-मुख्य विश्वस्त आणि मंडळ सदस्य म्हणून दिल. ह्या सेवेचे दान उभा जन्म म्हणजे तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी पाहिला. तसेच निरा-नरसिंहपुर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य तथा कार्याध्यक्ष म्हणून ते शैक्षणिक क्षेत्रात ही हिरीरीने कार्यरत राहिले.
तसेच १९७० च्या काळात श्रीमंत शिवराज गणेशोत्सव मंडळ, अखिल मंडई चे संस्थापक अध्यक्ष होते. आज डौलाने आणि अभिमानाने उभे असलेल्या गणेशोत्सव मंडळाची सुरूवात दादांसाहेबांनी देशपांडे वाड्यातुन केली. तर गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात अनेक धार्मिक-सामाजिक उपक्रम राबवत नवयुवकांना एक चांगली दिशा देण्याचे काम केले.
देश-समाज उत्तमरित्या चालवायचा असेल तर त्याचा कणा हा सहकार तथा अर्थकारणावर उभा असतो.
ह्या उक्तीप्रमाणे इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी १९८० च्या दशकात जनता सहकारी बँक पुणे च्या इंदापूर शाखेच्या पायाभरणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्या माध्यमातून अनेक तरुणांना नोकर्या मिळवून दिल्या, विविध कर्जप्रकरणात महत्त्वपुर्ण कायदेशीर सल्ले दिले. तसेच बँकेच्या इंदापूर सल्लागार मंडळ सदस्य म्हणून ३५ वर्षांहून अधिककाळ सेवा दिली.
इंदापूर-बारामती लोकसभा क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कडवट स्वयंसेवक तथा माननीय संघचालक म्हणून ४० वर्षां पासून अधिक काळ कार्य केले.
बारामती पंचक्रोशीतील रा.स्व.संघ, विहिंप, जनसंघ आणि आजच्या भारतीय जनता पार्टीच्या उभारणीतील योगदान अविस्मरणीय आहे 🙏
ज्यामध्ये १९७५ च्या आणीबाणीतील सत्याग्रही, श्री रामजन्मभूमी आंदोलनाचे कारसेवक, स्वामी विवेकानंद शिलान्यास निर्मिती आंदोलन, रामसेतू बचाव कार्य, तळजाई पठारावरील शिबीर, विश्व मंगल गोग्राम यात्रा, रा स्व संघ संपर्क अभियान, स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह इ. विषय त्यांनी तडीस नेले आणि अनेक अभियान-आंदोलनाचे नेतृत्व करत इंदापूर तालुक्यातील हिंदूत्ववादी चळवळीचा पाया रचला. आजच्या संघ-भाजप आणि संघ परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांना दादासाहेब घडवलेच नाही तर सक्षमपणे संघकार्यास उभे केले.
अशा धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बाजू समजून घेताना ह्या दादासाहेबांच्या नातवाला एक प्रेमळ आजोबा लाभले तर तेवढेच कडक शिस्तीचे गुरू, कणखर नेतृत्व, विविध विषयांवरील उत्तम वाचक तथा वक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व मिळाले. माझ्या शालेय जीवनातील प्रत्येक वकृत्व स्पर्धेचे मार्गदर्शक, प्रत्येक परिक्षेतील दिशादर्शक आणि *मला बोटं धरून संघाच्या शाखेत नेणारे माझे लाडके दादा यांना कोटी कोटी प्रणाम!*
असे आपले इंदापूर भुषण, अभ्यासू वकील, श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानचे पुर्व मुख्यविश्वस्त, जनता सहकारी बँक पुणे शाखा इंदापूर चे कायदेशीर सल्लागार, इंदापूर तालुक्याचे पुर्व संघचालक तथा माझे आजोबा श्री. श्रीनिवास हनुमंत देशपांडे (दादा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली…..!
प्रभु श्रीरामचंद्र व श्री लक्ष्मी नरसिंह यांच्या आत्म्यास सुख शांती देवो ही प्रार्थना🙏🙏
(देवाज्ञा – ०७/०२/२०२५)
#दादासाहेब_देशपांडे #RSS #Niranasinghpur #श्रीलक्ष्मीनृसिंहदेवस्थान #इंदापुर