इंदापूरच्या कोविड सेंटरमध्ये सोयी-सुविधांचा तुटवडा रुग्णांचे भयंकर हाल.

इंदापूरच्या कोविड सेंटरमध्ये सोयी-सुविधांचा तुटवडा रुग्णांचे होत आहेत भयंकर हाल.

सध्याच्या कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने मोठया प्रमाणात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुनश्च: सुरु केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोरोना उपचार केंद्रात सुविधाअभावी, दाखल रुग्णांना अनेक गैरसोयींना सामोरे जाण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

शहरातील उपजिल्हा शासकीय रुग्णालय व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोरोना उपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. मध्यंतरी रुग्णसंख्या रोडावल्याने वसतिगृहातील उपचार केंद्र बंद करण्यात आले होते. सद्यस्थितीत वाढणा-या कोरोना रुग्णांमुळे आठवड्यापूर्वी ते पुन्हा सुरु करण्यात आले. सध्या तेथे ऐंशी रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु तेथे सुविधांचा अभाव जाणवत आहे. काही रुग्णांच्या खोल्यांमध्ये विजेची व्यवस्था नाही. शौचालय, बाथरुममध्ये नळ नादुरुस्त असलेने पाणी नाही.पंखे नादुरुस्त आहेत. त्यामुळे डासांच्या त्रासाने रुग्णांना रात्री झोपच  लागत नाही.

कोरोना व डासांचा त्रास अशा दुहेरी संकटांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार तक्रार करुनही काही उपयोग होत नाही. गटविकास अधिका-यांनी येथे येऊन पहाणी केली. परंतु त्यात काही सुधारणा झालेली नाही.

तेथे कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे.रूग्णांच्या रोषाला त्यांनाच सामोरे जावे लागत आहे.

या साठी वरिष्ठ अधिकारी यांनी याचि दखल घेऊन आडचणि दुर करण्यात याव अशि अपेक्षा सर्व इंदापुर कर करत आहेत.