नवी दिल्ली:-श्रीलंकेच्या नौदलाने डेल्फ्ट बेटाजवळ भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात ५ भारतीय मच्छिमार जखमी झाले. जखमींपैकी २ मच्छिमारांची प्रकृती गंभीर आहे. तर अन्य तिघांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं गोळीबाराची गंभीर दखल घेतलेली आहे. भारतानं कारवाईचा विरोध करत श्रीलंकेच्या उच्चायुक्तांना समन्स बजावलं आहे.*
*👉🔴🔴👉श्रीलंकन नौदलानं केलेली कारवाई स्वीकारार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. ‘कराईकल बंदरावरुन १३ भारतीय मच्छिमार मंगळवारी पहाटेच्या सुमारास डेल्फ्ट बेटाजवळ मासे पकडण्यास गेले होते. त्यांना श्रीलंकन नौदलानं सागरी सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली अटक केली. या दरम्यान श्रीलंकन नौदलानं गोळीबार केला,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे.*
*👉🅾️🅾️👉मच्छिमार परुथी थुराईजवळ मासे पकडत होते. तेव्हा त्यांना श्रीलंकन नौदलाच्या गस्ती बोटीनं घेरलं. श्रीलंकेच्या नौदलानं सागरी सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली १३ मच्छिमारांना अटक केली आणि त्यांची बोट ताब्यात घेतली. मच्छिमारांनी बोट तमिळनाडूच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा श्रीलंकन नौदलानं गोळीबार केला. नौदलाच्या बोटीवर एक श्रीलंकन अधिकारीही हजर होता. गोळीबारात दोन मच्छिमार जखमी झाले. अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना कांगेसंतुरई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.*