img 20250126 wa0009चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना इंटरनॅशनल स्कूल, सरडेवाडी यांना नुकतेच ISO – 9001: 2015 हे मानांकन जाहीर झाले त्याबद्दल चेतना फाउंडेशन इंदापूरचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव प्रा. विलास भोसले सर खजिनदार प्रा. सोमनाथ माने सर व सर्व संचालक मंडळ यांनी चेतना इंटरनॅशनल स्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांचे अभिनंदन केले. चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे म्हणाले की ISO मानांकन मिळण्यासाठी संस्थेने काटेकोरपणे नियमांचे पालन केले, सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी सदर ISO मानांकनाचे चे प्रमाणपत्र 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे खजिनदार प्रा. सोमनाथ माने सर यांच्याकडे नमोन्यूजनेशन चेे संंपादक, आत्मनिर्भर उद्योग समूहाचे अध्यक्ष:- रामवर्मा आसबे यांच्याकडून सुपूर्द करण्यात आले यावेळी चेतना कॉलेजचे प्राचार्य डॉ सुजित देसाई तसेच स्कूल बस मालक चालक सतीश मिसाळ विठ्ठल गुरगुडे उपस्थित होते.
हे प्रमाणपत्र आत्मनिर्भर उद्योग समूह यांच्यामार्फत संस्थेला बक्षीस म्हणून देण्यात आले.