img 20250126 wa0019img 20250126 wa0019

चेतना फाउंडेशन इंदापूर येथील शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न🇮🇳🇮🇳🇮🇳

चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, चेतना इंटरनॅशनल स्कूल, चेतना ज्युनिअर कॉलेज सरडेवाडी इंदापूर येथे 26 जानेवारी 2025 निमित्त भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सुजित देसाई हे अध्यक्षस्थानी होते असेच कार्यक्रम साठी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे सचिव प्रा.विलास भोसले सर खजिनदार प्रा. सोमनाथ माने सर,संचालिका सौ. निकिता माने मॅडम संस्थेमधील सर्व शाखांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावर्षीचे ध्वजारोहण व भारत मातेचे प्रतिमापूजन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुजित देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर संस्थेच्या प्रांगणात विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यामध्ये कवायत प्रकार,लेझीम, देशभक्तीपर गीत मुलांची देशभक्तीपर भाषणे तसेच भारत हा देश विविधतेने नटलेला आहे तसेच लहान मुलांनी विविध वेशभूषा परिधान करून कार्यक्रमांमध्ये एक वेगळेपणाचे दर्शन घडवून आणले. यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सुजित देसाई यांनी सर्वांना 76 व्या प्रजासत्ताक दिनी मार्गदर्शन करताना म्हणाले 26 जानेवारी 1950 हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी ऐतिहासिक होता या दिवशी आपल्या देशाने संविधान लागू केली एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून अस्तित्व प्राप्त केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यासाठी एक मजबूत आणि लोकशाही प्रधान संविधान दिले ज्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क आणि स्वातंत्र्य मिळाले तसेच प्रजासत्ताक म्हणजे जनतेच्या हातात सत्ता असलेला देश भारतीय संविधान आपल्याला समानता स्वातंत्र्य आणि बंधुता यांचे संरक्षण देतो. प्रत्येक नागरिकाला शिक्षण विचार स्वातंत्र्य आणि संधी मिळाव्यात यासाठी संविधानाने व्यवस्था केलेली आहे आज देश प्रगतीच्या मार्गावर आहे पण आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आपण सर्वांनी आपले संविधान स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदान आणि लोकशाही मूल्ये जपण्याचा संकल्प केला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन भारताचा संकल्प करताना युवकांनी विज्ञान-तंत्रज्ञान आणि उद्योजकता यामध्ये प्रगती करून भारताला जागतिक स्तरावर नेतृत्व प्रदान करावे देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आव्हान केले. शेवटी सर्वांना प्रजासत्ताक दिनी संविधानाची शपथ देण्यात आली.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!