img 20250128 wa0008img 20250128 wa0008

चेतना फाउंडेशन इंदापूर संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय पुणे यांच्यामार्फत 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सर्व महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा असे आव्हान केले होते त्याचाच एक भाग म्हणून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर येथे विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषेचे संवर्धन हा उपक्रम महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा मराठी फलक लेखन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई हे अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग प्रा. चैतन्य महारनवर प्रा. सुरज माने यांनीही मराठी भाषेचे संवर्धन याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच महाविद्यालयामधील पदवी आणि पदविका मधील विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगती व्यक्त केली. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. उदय देशपांडे सचिव मा. विलास भोसले खजिनदार मा.सोमनाथ माने यांचे विशेष सहकार्य लाभले तरी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक ग्रंथपाल विकास हुबाले सर प्राध्यापिका नम्रता मोरे यांनी काम पाहिले स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक चैतन्य महारनावर यांनी केली तर आभार वैष्णवी डोईफोडे यांनी केले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!