मुंबई:-राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.*

*👉🛑🛑👉तसेच बायोमेट्रिक प्राणाली अवयव चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.सर्व शाळांना बायोमेट्रिक मशीन देण्यात आल्या आहेत.आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरीही बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे.*

*👉🟥🟥👉राज्यातील सर्व अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणाली किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्याचे आदेश राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये दिले आहेत.*

*👉🛑🛑👉गुरू अन् शिष्याचीही हजेरी बायोमेट्रिकवर!*

*शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिकवर घेतली जाणार आहे.ही हजेरी बंधनकारक असून शाळेला सुट्टी मारणाऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे.*

*👉🛑🛑👉बायोमेट्रिकवर चेहरा दाखवा हजेरी लावा*

*शाळेत आता विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो त्यांना हजेरी लावण्यासाठी प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे.त्याशिवाय हजेरी लागणार नाही.*

*👉🛑☄️🛑👉शासनाला नव्या नियमाची गरज का भासली?*

*शाळेत येणारे विद्यार्थी अनेकदा शाळा बुडवून बाहेर जातात.तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही असेच वागतात.मात्र, हजेरी शंभर % टक्के दाखवली जाते.ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने अंशतः अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलेली आहे.त्यामुळे सुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना आता पूर्णवेळ शाळेतच राहावे लागणार असल्याचा हा निर्णय आहे.*

*👉🛑🅾️🛑👉अपडेट द्यावे लागेल*

*शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी शिक्षण विभागाकडे संबंधितांना द्यावी लागणार आहे.अपडेट हजेरी दिल्यानंतरच अनुदान मंजुरी, पगार आदींबाबत विचार होणार आहे.*

*👉🛑🟥🛑👉शासनाला नव्या नियमाची गरज का भासली?*

*शाळेत येणारे विद्यार्थी अनेकदा शाळा बुडवून बाहेर जातात.तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही असेच वागतात.मात्र, हजेरी शंभर % टक्के दाखवली जाते.*

*🛑☄️🛑अनुदानाला लागणार कात्री*

*विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलेली असताना आता अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बंधनकारक करण्यात आलेली आहे.बायोमेट्रिक हजेरी नसेल तर शाळेच्या अनुदानाला कात्री बसणार आहे.*

*👉🛑🟥🛑👉अनेकांची वाढली अडचण*

*काही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळेत न येता आपले घरगुती काम करीत असतात.अशा शिक्षकांची आता अडचण वाढली आहे.*

*👉🛑☄️🛑हा नियम कोणत्या शाळांसाठी?*

*राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू असणार आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!