विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय फिक्स केले पाहिजे
सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज इंदापूर येथील विद्यार्थींना करियर मार्गदर्शन करताना चेतना फाउंडेशनचे सचिव विलास भोसले यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतर करिअरच्या वेगवेगळ्या इंजीनियरिंग , फार्मसी, एग्रीकल्चर, नर्सिंग पॅरामेडिकल स्पर्धा परीक्षा यामधील संधी या विषया वरती मार्गदर्शन केले तसेच सीईटी परीक्षांचे महत्व ऑनलाईन ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना लागणारे कागदपत्रे यांचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय फिक्स केले पाहिजे ते ध्येय गाढण्यासाठी अभ्यास केला पाहिजे तसेच विद्यार्थींनी बारावीची बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना अभ्यास कसा केला पाहिजे याची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयकुमार शिंगारे सर यांनी भोसले सरांचा सत्कार केला व झ धेंडे सरांनी आभार मानले त्यावेळेस हुबाले सर उपस्थित होते