मोठी स्वप्न पहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येय निश्चित करा

चेतना फाउंडेशन इंदापूर येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रथम वर्ष बी फार्मसी आणि डी फार्मसी च्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात *आरंभ* 2025 हा स्वागत समारंभ आयोजित केलेला होता.

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात असणारे विविध नोकरीच्या संधी तसेच परदेशातील शिक्षणासाठी असणारी विविध संधी काय आहे याची सखोल माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना कॉलेज आणि संस्थेबद्दल माहिती दिली विद्यार्थ्यांना मोठ्या स्वप्नांपर्यंत पोहचायचेअसेल तर ध्येय पण मोठे ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चेतना फाउंडेशन चे खजिनदार माननीय सोमनाथ माने सर यांनीही फार्मसी मधील नवीन विद्यार्थ्यांना संबोधित करताना कष्टाशिवाय पर्याय नाही प्रामाणिक कष्ट केले तर त्याचे फळ हे नक्की मिळते असे सांगितले.

दुपारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव विलास भोसले यांनी केले. माननीय भोसले सरांनी सुद्धा विद्यार्थ्यांना संबोधित करताना संस्थेने आणि कॉलेजने विद्यार्थ्यांना ज्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा पुरेपूर वापर करावा असे आव्हान केले.

कार्यक्रमाचे संयोजनासाठी प्राध्यापिका नम्रता मोरे व वैष्णवी डोईफोडे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय चेतना फाउंडेशन चे अध्यक्ष उदय काका देशपांडे सचिव विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने संचालक बोराटे साहेब यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!