इंदापूर….

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 अखेर वाचन पंधरवडा या कालावधीत “*वाचन संकल्प महाराष्ट्राचा*” अभिनव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर येथे शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी ग्रंथालय अभियान स्वच्छता आणि पुस्तक प्रदर्शन उपक्रमाद्वारे उत्साहात प्रारंभ झाला.
उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजित देसाई तसेच डॉ. अभिनंदन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य देसाई म्हणाले वाचनाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पोषण होण्यास असे सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. परंतु अलीकडच्या काळात देशातील बहुतांश वाचक वर्ग वाचन संस्कृती पासून दूर होत चाललेला दिसून येत आहे. म्हणून सध्याच्या पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालयातील वाचक व विद्यार्थी वर्ग यांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात करत प्रदर्शन सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा इत्यादी कार्यक्रम महाविद्यालयाच्या ग्रंथालयामार्फत 1 ते 15 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यात आपले योगदान द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक ग्रंथालय विभाग प्रमुख ग्रंथपाल श्री विकास हुबाले हे काम पाहणार आहेत. या कार्यक्रमासाठी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष मा. उदय काका देशपांडे सचिव मा. विलास भोसले आणि खजिनदार मा. सोमनाथ माने यांचे विशेष सहकार्य लाभले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!