इंदापूर प्रशासकीयभवन येथे दि. १० डिसेंबर २०२४ रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने इंदापूर नगरपालिका ते प्रशासकीय भवन पर्यंत मानव अधिकार मूक मोर्चा काढून बांगलादेश येथे अल्पसंख्याक हिंदू वरील अत्याचाराचा निषेध करून हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्यांक हिंदू हिताची योग्य ते पाऊल उचलावे अशा आशयाचे निवेदन पत्र इंदापूरचे तहसीलदार बनसोडे यांना सर्वांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने किरण प्रकाश गानबोटे, महेश सोपान बोधले, प्रेमकुमार जगताप, गोरख माने, शुभम जामदार, लखन जगताप, वैभव कोकाटे, सतीश देशपांडे, प्रशांत मिसे, सचिन शिरसागर, बाळासाहेब पानसरे, सागर गोसावी, माऊली चौरे, गजानन वाकसे, आकाश कांबळे, सिमा कल्याणकर, शितल साबळे, प्रतीक देवकर, अभिजीत कांबळे, नितीन देवकर, कर्जतकर, तानाजी वायाळ, भरत देशमाने, वैभव देशमाने, रोहित पवार, आर्य गानबोटे, प्रथम गवळी, सार्थक देशमाने,
पुष्पक गानबोटे, सोमा बागडे, व अजित राऊत, संतोष मोरे, अमित गायकवाड, धीरज शहा व इतर सकल हिंदू समाज कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, बांगलादेश मध्ये अल्पसंख्यांक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे. संन्याशी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्यांक हिंदू वरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजगृहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदरील घटनेचा निषेध एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे बांगलादेशमध्ये ४ ते २०
ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यामध्ये हिंदू समाजावर दोन हजाराहून अधिक जाती हल्ले झाले यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाची व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे याच्यावरील हल्लूयांचा समावेश आहे. दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उध्वस्त करून अल्पसंख्यांक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहे. बांगलादेश मधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेली आहे की हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. बांगलादेशमध्ये काही ठिकाणी तर हिंदू व अत्याचार होत असताना बांगलादेशचे लष्करच स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करत सी.सी.टीव्ही कॅमेरे मोडून काढतानाचे दृश्य समोर आले आहे. बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्यसंस्थाच अल्पसंख्यांक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारास सहाय्य करताना समोर आल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न नाही झाले तर संपूर्ण हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता वर्तवली आहे. बांगलादेशातील
हिंदूच्या मानवा अधिकाराचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे. आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेश मध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानव अधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांचे आहे. बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदू वरील अत्याचाराच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे.
आज हिंदू समाजात असलेला रोष हा या मानवाधिकार मूक मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्यांक हिंदू हिताची योग्य ते पाऊल उचलावे अशा आशयाचे निवेदन पत्र इंदापूर तहसीलदार

