चेतना इंटरनॅशनल स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमात संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमांमध्ये संविधानाचे उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आलं. संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची सर्व मुलांनी शपथ घेतली.