मुंबई:-बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर परिमाण होणार आहे. सध्या राज्यातील तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. सकाळी व रात्री थंडी वाढली असल्यामुळे अनेक जिल्हे गारठले आहेत. पुणे, नाशिक, रत्नागिरी, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात तापमानात कमी झाले आहे. किमान तापमानासोबतच कमाल तापमानात देखील १ ते २ अंशांनी घट झाली आहे.*
*👉🟥🟥👉डिसेंबर महिन्यात थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळं राज्यावरही त्याचे परिणाम होताना दिसत आहेत. जिथं हवेतील आर्द्रता कमी होऊ वातावरण कोरडं होत असल्याचं निदर्शनास येत आहे. राज्यातील परभणी, निफाड आणि धुळ्यात तापमानानं निच्चांकी आकडा गाठला असून, हा आकडा 10 अंशांच्याही खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या कोकणापासून विदर्भापर्यंतच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा आकडा 30 अंशांच्याही खाली आला असल्यामुळे थंडीचा प्रकोप वाढताना दिसत आहे.*
*👉🔴🔴👉हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान किंवा रात्रीच्या तापमानानंतर आता काही शहरातील कमाल किंवा दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे शहरातील कमाल तापमान सोमवारी २८.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आतापर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी कमाल तापमान होते. दरम्यान, किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आजपर्यंतच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान आहे. कमी होणारी आर्द्रतेची पातळी आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस तापमान आणखी घट होण्याची शक्यता आहे, असे आयएमडीचे पुण्यातील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी सांगितले. या वेळी शहरात पहाटे धुके पडण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असे सानप यांनी सांगितले.*