पुन्हा डोनाल्ड ट्रम्प सरकार!
*👉🔴🔴👉कमला हॅरिस यांचा पराभव करत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष,*
*👉🅾️🅾️👉बहुमताचा आकडा केला पार!!*
*👉🅾️🅾️👉अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत, आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत, अशी माहिती फॉक्स न्यूजने दिली आहे.*
*👉💥💥👉यावेळी रिपब्लिकन पक्षाने मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ट्रम्प यांच्या या विजयाने जागतिक स्तरावर चर्चेचा विषय निर्माण केला आहे.*
*👉🅾️🅾️👉ट्रम्पची विजयाची रणनीती-*
*या निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका सात स्विंग स्टेट्सने निभावली. या राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती, मात्र शेवटी ट्रम्प यांना या राज्यांमध्ये आघाडी मिळाली. विशेषत: दोन राज्यांमध्ये त्यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. अमेरिकेतील या कठीण निवडणुकीत ५३८ इलेक्टोरल कॉलेज मतांमधून २७० पेक्षा अधिक मतांची गरज असते, जी बहुमताचा आकडा पार करण्यासाठी अत्यावश्यक असते.*
*👉🅾️🅾️👉ताज्या माहितीप्रमाणे, डोनाल्ड ट्रम्प यांनी २७७ मतांचा आकडा पार करत. इलेक्टोरल कॉलेज मतांवर आघाडी घेतली आहे, तर कमला हॅरिस २२६ मतांवर स्थिरावल्या आहेत. बहुमताचा आकडा ट्रम्प यांनी गाठला आहे. तर कमला हॅरिस यांनी त्यांचे भाषण रद्द केले. तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प, जे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत, ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या समर्थकांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.*