बेरूत:-इस्रायलने लेबनानवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यामधील मृतांचा आकडा ५५८वर पोहोचला आहे. यात ५० मुले आणि ९४ महिलांचा समावेश आहे. सन २००६ मधील इस्रायल-हिज्बुल्ला युद्धानंतरचा हा सर्वांत भीषण हल्ला आहे.*

*👉🔴🔴👉इस्रायलच्या लष्कराने हिजबुल्लाहवर वर केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्याचा एक भाग म्हणून दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील रहिवाशांना बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. हजारो लेबनीज नागरिकांनी दक्षिणेकडून पळ काढण्यास सुरुवात केली आणि दक्षिणेकडील सिडॉन शहरामधून जाणारा मुख्य महामार्ग बैरूतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांमुळे खचला आणि गाड्या अडकून पडल्या होत्या. २००६ नंतरचे हे सर्वांत मोठे स्थलांतर होते. या हल्ल्यांमध्ये ५० मुले आणि ९४ महिलांसह ५५८ नागरिक ठार झाले. इस्त्राइलने हिजबुल्लाह विरोधातील युद्धाला विध्वंसक वळण लागले आहे. लेबनॉनमध्ये ३०० ठिकाणांना लक्ष्य करत जोरदार हवाई हल्ले चढवण्यात आले.*

*👉🟥🟥👉यामुळे लेबनॉनमध्ये सर्वत्र हाहाकार माजला आहे. ३४ वर्षानंतर लेबनॉनवर विनाशकारी संकट घोंघावत आहे. ज्यामध्ये आतापर्यंत १२०० हून अधिक ठिकाणे उद्धवस्त झाल्याचे वृत्त आहे. तर यामध्ये १८३५ नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर लेबनॉनजवळच्या ५४ रुग्णांलयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. हल्ल्यातील मृतांची संख्या २०२० मधील विनाशकारी स्फोटाहूनही अधिक आहे. या घटनेवेळी गोदामात साठवलेल्या शेकडो टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता. तेव्हा २१८ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर सहा हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले होते.*

*👉🟣🟣👉हिजबुल्लाहने केलेल्या हल्ल्यामुळे इस्त्राइलने प्रतिहल्ला करत बदला घेतला आहे. त्यामुळे लेबनॉन पूर्णपणे हादरला आहे. इस्त्राइलने लेबनॉनवर असा विध्वंसक हल्ला करण्याची पहिलीच वेळ आहे. यावेळी इस्रायलने केवळ निवासी भागांवर बॉम्बच टाकले नाहीत तर हिजबुल्लाचे भूमिगत तळही उद्ध्वस्त केले आहेत. भूमिगत तळांवर हल्ला चढवताच हिजबुल्लाहचे सैनिक तळांवरून पळून गेले आहेत. तर यापूर्वी हिजबुल्लाह इस्राइलवर हल्ला चढवण्याच्या तयारीत होते, परंतु मोसादने दिलेल्या पूर्वसूचनेमुळे आयडीएफने हिजबुल्लाहच्या हल्ल्याच्या कट उधळून लावला आहे. हिजबुल्लाहचे रॉकेट आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळ संपूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!