चेतना कॉलेज ऑफ फार्मसी सरडेवाडी इंदापूर ला डी फार्मसी ची मान्यता
चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजला शैक्षणिक वर्ष 2024 25 साठी डी फार्मसी या अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पी. सी . आय ) प्राधिकरणाकडून डी फार्मसी या शाखेसाठी 60 जागांची मान्यता मिळाली आहे
तसेच पी .सी .आय . बरोबर महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ (एम . एस . बी . टी . ई ) या दोघांच्या तज्ञ समितीने महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या सोयी – सुविधा व प्राध्यापक यांची सखोल तपासणी करून ही मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे आणि त्या विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील यशस्वी करिअर घडवणे हे संस्थेचे ध्येय असून बाहेरच्या विद्यार्थ्यांना वसतीगृह, बस व कॅन्टीन ची सुविधा उपलब्ध आहे असे संस्थेचे अध्यक्ष श्री उदय देशपांडे, सचिव श्री विलास नामदेव भोसले, खजिनदार श्री सोमनाथ पांडुरंग माने यांनी सांगितले आहे .

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!