संपादक:- रामवर्मा आसबे

चेताना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या विद्यमाने जागतिक औषध निर्माता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले. यावेळी उदय देशपांडे, सचिव विलास भोसले खजिनदार सोमनाथ माने उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे संचालिका निकिता सोमनाथ माने तसेच संचालिका प्राजक्ता विलास भोसले उपस्थित होत्या.

प्राचार्य डॉ. नेहा काजळे यांनी जागतिक स्तरावर आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी फार्मासिस्टची भूमिका महत्त्वाची असते या विषयावर मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख प्रा.प्रियंका पारेकर यांनी फार्मसी मधील करिअर या विषयावर त्यांना मार्गदर्शन केले.

प्रा‌. सुप्रिया पांढरे, प्रा. तनुजा काशीद व प्रा. भैरव व्यवहारे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतीक्षा राजगुरु यांनी केले.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!