पुणे, दि. १४: औंध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती औंध औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक तथा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण पुणे प्रादेशिक सह संचालक रमाकांत भावसार यांनी दिली आहे.

राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये संविधान मंदिराची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रमाचे एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई येथे सकाळी ११.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.

औंध येथे आयोजित कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी, परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. भावसार यांनी केले आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!