
यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप आयुक्त वर्षा लढ्ढा- उंटवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
मतमोजणी प्रक्रिया पार पाडताना नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपसात समन्वय ठेऊन भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, असे निर्देश डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी दिले.
विभागीय आयुक्त यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, निवडणूक निरीक्षक, उमेदवार आणि उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्षात करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी केंद्रातील केलेल्या तयारीची तसेच व्यवस्थेबद्दलची सविस्तर माहिती दिली.
