
दिनांक 2/6/2024 वार रविवार रोजी सकाळी मा. पुणे विभाग शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी चेतना फाउंडेशन ला सदिच्छ भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष मा.उदय देशपांडे सर, सचिव विलास भोसले सर ,खजिनदार सोमनाथ माने सर हे उपस्थित होते .यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. उदय देशपांडे यांच्या हस्ते मा. दत्तात्रय सावंत यांचा सत्कार व स्वागत समारंभ करण्यात आला. तसेच त्यावेळी श्री विलास कृष्णा गाढवे सर हे देखील उपस्थित होते. त्यांचाही सत्कार संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी सावंत सरांनी शैक्षणिक धोरण 2024 याबद्दल माहिती सांगितली तसेच शैक्षणिक समस्यांविषयी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले .शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दत्तात्रय सावंत यांनी दिले .संस्थेचे सचिव विलास भोसले सर यांनी मा. आमदार साहेबांना फाउंडेशन विषयी माहिती दिली या ठिकाणी चेतना इंटरनॅशनल स्कूल ,चेतना ज्युनिअर कॉलेज व चेतना कॉलेज ऑफ फार्मसी यांना शासनाची मान्यता मिळाल्याचे सांगितले.
मा.दत्तात्रय सावंत यांनी संस्थेने शैक्षणिक रित्या शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रमयाबद्दल पाहणी केली. व त्यांनी राबवलेल्या उपक्रमांचे कौतुकही केले. तसेच चेतना फाउंडेशन ला भेट देऊन शिक्षकांना व विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल संस्थेचे खजिनदार सोमनाथ माने सरांनी आभार व्यक्त केले.
