⭕ माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यभर भा.ज.पा.ची निदर्शनं !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.
भा.ज.पा.ने आक्रमक भूमिका घेतली असून, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तसेच, या पार्श्वभूमीवर राज्यभरात भा.ज.पा.च्यावतीनं निदर्शनं देखील करण्याता येणार आहेत.
भा.ज.पा. प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होतं,
परमवीर सिंग यांचे धक्कादायक गंभीर पत्र.
हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिध्द करण्याचा विडाच उचलला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढायला हवे.
तसेच, राज्यातील महाविकासआघाडी नाही तर म्हणजे महावसुली आघाडी.
असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे.
गृहमंत्र्यांनी हप्ता गोळा करायचं टार्गेट दिल होत,
परमवीर सिॅग यांचे धक्कादायक गंभीर पत्र. हे राज्यातील सरकार खंडणीखोरांच, गुन्हेगारांचे हे सिध्द करण्याच विडाच उचलला आहे. .
अनिल देशमुख यांनी तातडीने बाजूला व्हायला हवे अथवा यांनी त्यांना काढायला हवे.
“गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलाला आहे.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!