रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती

*मुंबई:-महाविकास आघाडी मधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याने त्यांना ही कमान देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. आता शुक्ला या रजनीश सेठ यांची जागा घेणार आहेत. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.*

*👉🟥🟥👉आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक पदासाठीच्या ज्येष्ठता यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर होते. शुक्ला यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा होती. शेवटी त्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली.रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असतील. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात.*

*👉🅾️🅾️👉केंद्रीय लोकसेवा आयोगाची बैठक शुक्रवार २९ डिसेंबर रोजी झाली. यावेळी त्यांनी महासंचालकपदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवली होती. यामध्ये पहिले नाव होते रश्मी शुक्ला. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा होता. अखेर आज सरकारने शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.*

*👉🛑🛑👉तर 1988 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या रश्मी शुक्ला यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती.तसेच शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले. नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणाची शुक्ला यांच्यावर आरोप होते.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!