पुणे –
भारतीय जनता युवामोर्चा चा एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश…
काल विद्यार्थ्यांची परीक्षा ठरलेल्या वेळी घेण्यात यावी या विषयासाठी पुणे येथे उग्र आंदोलन करण्यात आले …या विषयात विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी लढाई लढत असताना सरकारने आम्हाला अटक करून गोपीचंद जी पडळकर तसेच आमच्या सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत.
# पण अखेर सरकार ला नमावे लागले…
या आंदोलनामुळे सरकारला पुढे ढकललेल्या एमपीएससी परीक्षा त्वरित घेण्यासाठी निर्णय करावा लागला आणि 21 मार्चला या परीक्षा घेतल्या जातील असा निर्णय तातडीने जाहीर करावा लागला आहे.
जर 21 मार्चला परीक्षा झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी पुढील आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चा ताकतीने सहभागी होईल…
विक्रांत बाळासाहेब पाटील
प्रदेश अध्यक्ष
भारतीय जनता युवा मोर्चा

