संपादकीय:-

पाचोरा येथील स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केली होती.त्याच्या दुसर्‍या दिवशी आ.पाटील यांच्या गुंडाकरवी पत्रकार संदीप महाजन यांना बेदम मारहाण करण्यात आली.या घटनेचा संपुर्ण राज्यभरातील पत्रकार संघटना,सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरीक निषेध व्यक्त करत आहेत.तर राज्यातील अकरा संघटनांनी एकत्र येवुन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेवुन सदर प्रकरणी आ.किशोर पाटील व मारहाण करणारे संबधीत गावगुंड यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गरत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तसेच दि.१७ आॅगष्ट २०२३ रोजी संपुर्ण राज्यभरातील पत्रकार हे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.तरी पाचोरा (जि.जळगाव)येथे आपल्याच पत्रकार बांधवाला गावगुंडाकरवी झालेल्या मारहाणीचा व आ.किशोर पाटील व त्यांचे गावगुंड यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी व पत्रकार संदिप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे.आणि घडलेली घटना ही निंदनिय असल्याने सदर घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवार दि.१४ आॅगष्ट २०२३ रोजी सकाळी ठीक आकरा वाजता नगरपरिषद मैदान इंदापूर येथे तालुक्यातील सर्व पत्रकार बंधु, सामाजिक संघटना पदाधिकारी व राजकीय क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित रहावे.घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी नगरपरिषद मैदान येथुन सकाळी ११ वाजता सर्व पत्रकार व सामाजिक राजकीय कार्यकर्ते हे काळ्या फिती लावुन सर्वप्रथम इंदापूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात येईल.व त्यानंतर तहसिल कार्यालय इंदापूर येथे निवेदन देवुन शांततामय मार्गाने निषेध नोंदविण्यात येणार आहे.तरी सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती.

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!