मुंबई:-कोरोना विषाणूने विश्रांती घेतल्याची स्थिती निर्माण झाली असताना मुंबईतून एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचे राज्य सरकारकडून कळवण्यात आले आहे.सरकारने असं स्पष्ट केलंय की, हा मृत्यू या महिन्यात झालेला नसून जुलै महिन्यात झाला आहे. फक्त त्याची नोंद बुधवारी घेण्यात आलेली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील बातमी दिली आहे.*

*👉🛑🛑👉मृत्यू झालेला रुग्ण 75 वर्षीय पुरुष असून त्याला लिव्हरचा कँन्सर होता, अशी माहिती बीएमसी आरोग्य अधिकारी डॉ. दक्शा शहा यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली होती, पण मृत्यूचे ते प्राथमिक कारण नाही. जुन आणि जुलै महिन्यात शहरामध्ये एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदला गेला नव्हता.*

*👉🅾️🅾️👉जुलैमध्ये एक मृत्यू झाला होता, पण तो बुधवारी नोंद करण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच चाचण्या घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. राज्यात बुधवारी 14 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!