नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा कोरोनाने वेगाने पसरण्यास सुरुवात केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना कोविड-19 ची लागण झाली आहे, तर पाचवे न्यायाधीश नुकतेच बरे झाले आहेत.*

*👉🟥🟥👉समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात सामील असलेल्या न्यायाधीशांचा कोरोनाची लागण झालेल्या न्यायाधीशांमध्ये समावेश आहे.*

*👉🔴🔴👉खंडपीठातील आणखी एका न्यायाधीशाची तब्येत ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सोमवारी होणारी या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. महामारीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये, कोर्टाच्या कामकाजावर वाईट परिणाम केला होता, त्यावेळी अनेक न्यायाधीश आणि शेकडो न्यायालयीन कर्मचारी संक्रमित झाले होते.*

*👉🔴🔴👉रविवारी (23 एप्रिल 2023) देशात कोरोनाचे 10,112 नवे रुग्ण आढळले आहेत. कोविड-19 मुळे 19 जणांचा मृत्यू झाला. तर आदल्या दिवशी 12000 हून अधिक कोरोना संसर्गाच्या रुग्णांची नोंद झाली होती. या अर्थाने आज कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. देशात सध्या कोरोनाच्या ॲक्टिव्ह केसेस 67,806 आहेत.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!