img 20230623 wa0026
मुंबई:-मुंबई व पुणे शहरात बाँबस्फोटा घडवण्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात इसमाने फोन कॉलद्वारे मुंबई पोलिसांना ही धमकी दिली आहे. पोलिसांना आलेल्या एक फोनमुळे खळबळ उडाली आहे. माझी मागणी पूर्ण झाल्यावर मी माझ्या माणसांसोबत परदेशात निघून जाईन, असेही त्याने म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.*

*👉🟥🟥👉या कॉलरने गुरुवारी सकाळी 10 वाजता मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केला. यावेळी त्याने म्हटले की, 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात मी बॉम्बस्फोट करणार आहे. मला दोन लाख रुपयांची गरज असून ही रक्कम मिळाल्यानंतर मी बॉम्बस्फोट करणार नाही असे त्या फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले. दोन लाख रुपये मिळाल्यास आपण आपल्या माणसांसोबत मलेशियाला निघून जाऊ, असा दावा या कॉलरने केला आहे.*

*👉🅾️🅾️👉कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासात समोर आले आहे. अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम 505(1)(बी), 505(2) आणि 185 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!