Press Information Bureau Government of India शिक्षण मंत्रालय

PIB Delhi

English

Press Information Bureau
Government of India

 

शिक्षण मंत्रालय

भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित, जी-20 शिक्षण कार्यगटाच्या पुण्यातील चौथ्या बैठकीची आज सांगता

बैठकीचा निष्कर्ष आराखडा विकसित करण्यासाठी भारतीय अध्यक्षपदावरून होत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची सर्व सहभागी देशांच्या प्रतिनिधींनी केली प्रशंसा

जी-20 शिक्षण मंत्र्यांची बैठक उद्या पुण्यात होणार

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने, जी-20 शिक्षण कार्य गटाच्या (EdWG) चौथ्या आणि अंतिम बैठकीचे पुण्यात यशस्वी आयोजन केले होते, या बैठकीची आज सांगता झाली. जी-20 सदस्य देशांचे सुमारे 80 प्रतिनिधी, आमंत्रित देश आणि शिक्षण कार्यगटाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, या बैठकीला उपस्थित होते.

दोन दिवसीय बैठकीचे अध्यक्षस्थान भारतीय अध्यक्ष आणि उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव, संजय कुमार यांनी भूषवले. तर, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव अतुल कुमार तिवारी पर्यायी अध्यक्ष म्हणून होते. पहिल्या दिवशी भारत सरकारच्या G- 20 अध्यक्षांचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन शृंगला हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

 

या बैठकीचा निष्कर्ष आराखडा विकसित करण्यासाठी, सर्व जी-20 प्रतिनिधींनी संपूर्ण प्रक्रियेत दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल के संजय मूर्ती यांनी आभार व्यक्त केले. त्यांच्या ह्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करत, उद्या म्हणजेच 22 जून 2023 रोजी होणाऱ्या मंत्रिस्तरीय बैठकीत, सर्व सदस्य मंत्री हा निष्कर्ष आराखडा औपचारिक रित्या स्वीकारतील. ज्यातून, शिक्षण कार्यगट ट्रॅकमहडे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या व्यापक चर्चा आणि विचारमंथन यातून रचलेल्या पायावर एक ठोस कळस चढवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

शिक्षण कार्यगटाच्या ह्या चौथ्या बैठकीदरम्यान, G20 प्रतिनिधींनी अहवाल आणि संकलन विकसित करण्याच्या दिशेने भारतीय G-20 अध्यक्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची प्रशंसा केली. हा निष्कर्ष आराखडा आंतरराष्ट्रीय समुदायासाठी मार्गदर्शक ठरेल, सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी यातून एक निश्चित आणि योग्य दिशा मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

शैक्षणिक कार्यगट भारतीय जी 20 अध्यक्षतेच्या “वसुधैव कुटुंबकम” किंवा “एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य” या संकल्पनेशी संरेखित आहे, या कार्यगटाच्याअ मागील 4 बैठकांमध्ये , आजच्या विविध जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक उपाय आणि सामूहिक कृती शोधण्यात आल्या. मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे, विशेषत: मिश्र शिक्षणाच्या संदर्भात; तंत्रज्ञान-आधारित शिक्षण अधिक समावेशक, गुणात्मक आणि सहयोगी बनवणे; भविष्यातील कामाचे स्वरूप लक्षात घेता क्षमता बांधणी करणे आणि आजीवन शिक्षणाला चालना देणे; आणि वाढीव सहयोग आणि भागीदारीद्वारे संशोधनाला बळ देणे आणि नवोन्मेषाचा विस्तार यासह 4 प्राधान्य क्षेत्रांवर भर यात देण्यात आला आहे.

 

4थ्या शैक्षणिक कार्यगटाच्या बैठकीच्या आधी ‘विशेषत: मिश्र शिक्षणाच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुनिश्चित करणे’ (एफएलएन ) या विषयावर परिसंवाद झाला.सहभागींमध्ये सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्थंमधील मधील अनेक वक्ते सहभागी झाले होते यावेळी त्यांनी शिकण्याचे दृष्टिकोन आणि अध्यापनशास्त्र, शिक्षकांची भूमिका, क्षमता बांधणी करणे आणि बहुभाषिकतेच्या संदर्भात शिक्षकांचे प्रशिक्षण या एफएलएनशी संबंधित विषयांवर चर्चा केली.

याव्यतिरिक्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 17 ते 22 जून 2023 या कालावधीत मल्टीमीडिया प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 40,000 हून अधिक उपस्थित आणि 80+ प्रदर्शकांसह, हे प्रदर्शन एफएलएन संबंधित उपक्रम प्रदर्शित करण्याची संधी प्रदान करते.प्रदर्शनात सहभागी 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील उल्लेखनीय सहभागींमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, भारतीय ज्ञान प्रणाली (इंडियन नॉलेज सिस्टम), मायक्रोसॉफ्ट, निपुण भारत उपक्रम, इंडोनेशिया, युनिसेफ, युनेस्को आणि इतर अनेकांचा समावेश आहे.