महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष”पदी”आमचे मित्र पत्रकार आबा खवणेकर यांची निवड
तसेच रायगड जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार शैलेश पालकर तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष”पदी” पत्रकार चंद्रकांत बनकर यांची निवड करण्यात आली
राज्यासह जिल्हाभरातून खवणेकर यांच्यासह सर्वांवर होत आहे कौतुकाचा वर्षाव.
वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे सुपुत्र,’कोकणचा तडाखा’ या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा तथा निर्भिड पत्रकार आबा खवणेकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष”पदी” निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष श्री वसंत मुंडे आणि राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार नुकतेच या बाबतचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे यांनी आबा खवणेकर यांना दिले आहे.आबा खवणेकर हे निर्भिड पत्रकार म्हणून ओळख आहे.
