पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळेत मानधनावर काम करणाऱ्या ९३ शिक्षण सेवकांच्या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, कुणाल खेमनार, शिक्षण प्रमुख मिनाक्षी राऊत, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह शिक्षण सेवकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये २००९ आणि २०११ मध्ये टप्प्याटप्प्याने रजा मुदत शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली होती. सदर शिक्षण सेवकांच्या शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला असून, त्या संदर्भातील शासन आदेश राज्यभर लागू करण्यात येत आहे. सदर शासन आदेशाची तातडीने अंमलबजावणी करुन शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले.
तसेच, ९३ शिक्षण सेवकांना सेवेत नियमीत करण्याचे आदेश माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने नगर विकास विभागाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा करुन, लवकरच शिक्षण सेवकांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.