img 20230611 wa0012
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणंद ते फलटण मार्ग तसेच पालखी स्थळांची पाहणी केली. यावेळी वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.*

*👉🅾️🅾️👉यावेळी चव्हाण म्हणाले, सध्या उन्हाळ्याची परिस्थिती पाहता पालखी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व विसाव्याच्या ठिकाणी मंडप उभे करावे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा पुरेशा औषध साठ्यांसह सज्ज ठेवावी. पालखी मार्गातील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ बुजवावे. जागोजागी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश मंत्री चव्हाण यांनी दिले.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!