वाँशिंग्टन:- कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार असल्याचा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. येत्या काही दिवसात जगाने कोविडपेक्षाही प्राणघातक विषाणूसाठी तयार राहावे असं डब्ल्यूएचओ प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी म्हटले आहे. कोरोनाचा धोका कमी होत असताना पुन्हा एकदा गंभीर इशारा देण्यात आल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. हा आजार भयंकर असून मृत्यूचं प्रमाण अधिक असेल. त्यामुळे जगाने याचा सामना करण्यासाठी तयार राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे जगभरात ७० लाख लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र या महामारीमुळे २ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.*

*👉🟥🟥👉डब्ल्यूएचओ प्रमुखांनी जिनिव्हा येथील वार्षिक आरोग्य परिषदेत सांगितले की, आता येणारी महामारी थांबवण्याची वेळ आली आहे. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या जागतिक आरोग्य परिषदेच्या बैठकीत WHO प्रमुखांनी इशारा दिला की कोविड-19 महामारी अजून संपलेली नाही. डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितले की, कोविडनंतर आणखी एका प्रकारच्या आजाराचा धोका असू शकतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. ही महामारी कोविडपेक्षाही घातक ठरू शकते. तसेच या महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना जीव गमवावा लागेल. यासाठी जगाने तयार राहावे, असं आवाहन केलं आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्यास आम्ही बांधील आहोत, असंही डॉ. टेड्रोस यांनी सांगितलं आहे.*

*👉🟣🟣👉डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला की, कोरोना अद्याप संपलेला नाही. टेड्रोस म्हणाले की, ”लवकरच मोठी महामारी येणार आहे. यासाठी आपण आतापासूनच तयार राहायला हवं.” ते म्हणाले की, ”ही पिढी साथीच्या आजाराला चांगल्या प्रकारे सामोरे गेली आहे. महामारीशी त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. कारण लहानसा विषाणू किती भयानक असू शकतो याचा अनुभव या लोकांनी घेतला आहे. दरम्यान, कोरोना महामारी आणि नवीन व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडा. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षण असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!