मुंबई:-भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील लोकसभा मतदारसंघात महासंपर्क अभियान राबवलं जाणार आहे. 31 मे ते 31 जून दरम्यान हे संपर्क अभियान राबवलं जाणार आहे.या अतंर्गत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती विविध घटकांना करून दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विकास यात्रेचं देखील आयोजन करण्यात येणार आहे.*

*👉🟥🟥👉प्रवीण दरेकरांकडे महत्त्वाची जबाबदारी*

*महाराष्ट्रातील महासंपर्क अभियानाची जबाबदारी ही भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात.*

*👉🔺🔺👉महिनाभर चालणाऱ्या या महासंपर्क अभियानावर दिल्लीच्या नेत्यांचं लक्ष असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी ही यात्रा अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील मोठी कामे विविध घटकांना प्रत्यक्ष जागेवर नेवून दाखवण्यात येणार आहेत.*

*👉🅾️🅾️👉काँग्रेसकडूनही तयारीला सुरुवात*

*दरम्यान दुसरीकडे काँग्रेसकडून देखील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.*

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!