औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना खंडणी मागणाऱ्यांना व त्रास देणाऱ्या संघटना व गुन्हेगारांनवर कडक कारवाई करणार,पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार

img 20230506 wa0037

पुणे :- पुणे शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमारांनी काही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) आढावा बैठकीत सज्ज इशारा दिला आहे त्यांनी ‘कामगिरी दाखवा, नाहीतर उचलबांगडी नक्की’. एवढेच नाही, तर सहायक पोलिस आयुक्तांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत त्यांनादेखील प्रतिबंधात्मक कारवाईवर लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर पोलिसांचा अंकुश असला पाहिजे. त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर द्या. कारवाईमुळे घडू पाहणार्‍या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच रोखता येते. मात्र, तसे काम होताना दिसून येत नाही. गुन्हेगारी कमी करण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल, तर तत्काळ वेगळा विचार करावा लागेल, असा इशारादेखील आयुक्तांनी दिला आहे.पुणे शहरातील काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. खून, खुनाच्या प्रयत्नाच्या या गंभीर घटना आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई केली असती, तर त्या रोखतादेखील आल्या असत्या.*

*👉🔴🔴👉गुन्हेगारी वाटेवर चालू पाहणार्‍या अल्पवयीन मुलांसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम हाती घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या पालकांनादेखील या उपक्रमात सहभागी करून घेत त्यांना गुन्हेगारी कृत्यामुळे होणार्‍या गंभीर परिणामाची जाणीव करून देण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तालयात गुरुवारी ही बैठक पार पडली. या वेळी सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आदी अधिकारी उपस्थित होते.*