मुंबईत इन्फ्लुएन्झाचे 118 रुग्ण,H3N2 चे 15 रुग्ण तर कोरोनाच्या 176 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई:-राज्यात आधी कोरोनाचा संसर्ग होता. त्यानंतर इन्फ्लुएन्झा एच्या H3 N2 चा संसर्ग झालेल रुग्ण आढळत आहे. भरीस भर म्हणजे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. हवामान बदलत असताना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.मुंबईमध्ये गेले तीन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. त्यातच आता इन्फ्लुएन्झा एच्या H3 N2 या विषाणुचा शिरकाव झाला आहे. मुंबईत H3 N2 या विषाणूची लागण झालेले १५ रुग्ण आढळून आले आहेत. H1 N1 आणि H3 N2 इन्फ्लुएन्झाचे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात ११८ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.*

*👉🟥🟥👉मुंबईत H3 N2 चे १५ रुग्ण -*

*मुंबईत तीन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. मार्चमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मुंबईकर चिंतेत असताना H3 N2 चे १५ रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीत १, फेब्रुवारीत ७ तर मार्च मध्ये ७ रुग्ण आढळून आले आहेत. इतर H1 N1 चे १०३ असे इन्फ्लुएन्झाचे एकूण ११८ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या H3 N2 चे ४ तर H1 N1 चे २८ असे एकूण ३२ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. H3 N2 च्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात १० बेडचा स्पेशल वॉर्ड तैनात ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे असे आवाहन डॉ. संजीवकुमार यांनी केले आहे.*

*👉🛑🛑👉राज्यात इन्फ्लुएन्झाचे ३६१ रुग्ण -*

*राज्यात इन्फ्लुएन्झाचे एकूण ३६१ रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. H1 N1 चे ३०३ रुग्ण आढळून आले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर H3 N2 चे ५८ रुग्ण आढळून आले आहेत. H3 N2 चे ४८ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागपूर आणि अहमदनगर (छत्रपती संभाजी नगर) येथे इन्फ्लुएन्झा ए च्या H3 N2 मुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही मृत्यू संशयित मृत्यू म्हणून नोंद झाले आहेत. डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालानंतर हे मृत्यू नेमके H3 N2 चे आहेत का हे स्पष्ट होणार आहेत. राज्यात H1 N1 म्हणजेच स्वाईन फ्लूचे २०१७ ते २०२३ या सात वर्षाच्या कालावधीत १५ हजार ५५० रुग्ण आढळून आले असून १७०८ मृत्यू झाले आहेत. राज्यात 11 मार्चला 114, 12 मार्चला 101 तर 14 मार्चला 155 रुग्णांची नोंद झाली. त्यात आणखी वाढ होऊन 15 मार्चला 176 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत 31 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना इन्फ्लुएन्झा या आजाराचे रुग्ण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असे आवाहन करण्यात आले आहे.*

*👉🔴🔴👉राज्यात 176 नवे रुग्ण -*

*राज्यात 15 मार्च रोजी 176 रुग्णांची नोंद झाली आहे. 51 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 787 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 81 लाख 38 हजार 829 रुग्णांची नोंद झालेली आहे त्यापैकी 79 लाख 89 हजार 616 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 48 हजार 426 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11 मार्चला 114, 12 मार्चला 101, 15 मार्चला 155, 10 मार्चला 93, 9 मार्चला 90, 7 मार्चला 80 तर 3 मार्चला 66 रुग्णांची नोंद झाली होती.*

*👉🟥🟥👉मुंबईत 31 रुग्णांची नोंद -*

*मुंबईत 15 मार्च रोजी 31 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 168 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या तीन वर्षात एकूण 11 लाख 55 हजार 632 रुग्णांची नोंद झाली आहे त्यापैकी 11 लाख 35 हजार 717 रुग्ण बरे झाले आहेत तर 19 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 11 मार्चला 25, 12 मार्चला 19, 15 मार्चला 36, 10 मार्चला 21, 9 मार्चला 18 तर 2 मार्चला 18 रुग्णांची नोंद झाली होती.*

*👉🅾️🅾️👉रुग्णालयातील बेड रिक्त -*

*कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईमध्ये सध्या विविध रुग्णालयांत 4351 खाटा उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यापैकी 6 खाटांवर रुग्ण दाखल आहेत. सध्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची गरज भासत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास स्टँडबाय वर असलेली कोविड सेंटर सुरू करून तेथे रुग्णांवरती उपचार केले जातील अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.*

*👉🟥🟥👉अशी घ्या काळजी -*

*संसर्गजन्य आजारात तोंडावाटे किंवा नाकातून बाहेर पडणार्‍या स्रावातून आजार पसरत असतात. त्यामुळे मास्क वापरणे, वारंवार हात धुळे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, सर्दी, खोकला आणि तापासारखी लक्षणे असल्यास इतरांपासून दूर रहावे. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.*